Home /News /maharashtra /

मनसेनं रचला पहिला 'थर', पोलिसांनी नोटीसा देऊनही ठाण्यात दहीहंडीची तयारी सुरू

मनसेनं रचला पहिला 'थर', पोलिसांनी नोटीसा देऊनही ठाण्यात दहीहंडीची तयारी सुरू

  तर कितीही नोटीसा आल्या तरी मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे असा पुर्नरुच्चार देखील बाळा नांदगावकर यांनी केला.

तर कितीही नोटीसा आल्या तरी मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे असा पुर्नरुच्चार देखील बाळा नांदगावकर यांनी केला.

तर कितीही नोटीसा आल्या तरी मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे असा पुर्नरुच्चार देखील बाळा नांदगावकर यांनी केला.

ठाणे, 29 ऑगस्ट : राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने सुद्धा सण, उत्सव साजरे करू नये, असे आदेश दिले आहे. पण, तरीही मनसेनं दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) साजरा करणारच असा पवित्रा घेतला आहे. कलम 149 प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून देखील मनसे आपल्याला मतावर ठाम असून मनसेने ठाण्यात (thane) दहिहंडी उत्सवाची तयारी केली असून ज्या नौपाडा भागातील मैदानात मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू देखील केली आहे. पावसामुळे मैदानात उगवलेले गवत कापण्याचे काम मनसेने सुरू केले असून मंडप देखील उभारले जाणार आहे. या कामाची पाहणी करण्याकरता मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात आले होते. बंदी आणायची तर सर्व सणांवर आणा फक्त हिंदू सणांवर का? बस सुरू, रेल्वे सुरू इतर गर्दीची ठिकाणे सुरू, मग सणांवर निर्बंध का? असा सवाल यावेळेस मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला केला. आमच्यासारख्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री - राणे तर कितीही नोटीसा आल्या तरी मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे असा पुर्नरुच्चार देखील बाळा नांदगावकर यांनी केला. यावेळेस ठाण्यातील मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्ते दहीहंडी उत्सवाची तयारी करत होते. यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत, असं असूनही आम्ही दहीहंडी साजरी करणारच असा इशारा पुन्हा एकदा या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला.

'मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नाहीत', सुप्रिया सुळेंसमोरच माजी आमदाराचा आरोप

तर, राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई नाही, उद्घाटन घेण्यास मनाई नाही, आंदोलन करण्यास मनाई नाही फक्त हिंदू सण साजरे करण्याकरता करोना काळात मनाई आहे, असा आरोप करत यंदा काहीही झालं तरी दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा इशाराही रवींद्र मोरे यांनी दिला. “यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणारच याकरता नियम पाळत दहीहंडी साजरी करणार सर्व दहीहंडी मंडळाला विनंती दहीहंडी मंडळ स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असतील त्या मंडळांना दिलेल्या वेळेनुसार येऊन थर लावावेत” असे मेसेजस रवींद्र मोरे यांनी आपला मोबाईल नंबर देऊन व्हायरल केले होते. या व्हायरल मेसेजला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक गोविंदा पथक मंडळांनी स्वत:हून दहिहंडी उत्सवा दिवशी येवून थर लावू अशी इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती रवींद्र मोरे यांनी दिली. रविंद्र मोरे यांना देखील कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावली गेली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या