मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MNS Palghar Doctor Beaten : व्हिडीओ! हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, मनसे कार्यकर्त्यांचा प्रताप

MNS Palghar Doctor Beaten : व्हिडीओ! हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, मनसे कार्यकर्त्यांचा प्रताप

पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

राहुल पाटील(पालघर), 21 जानेवारी : पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रुग्णावर उपचार करण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात खळखट्याक केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. बोईसरमध्ये झालेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे पालघरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड करत एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्निल शिंदे असं या डॉक्टरचं नाव असून त्यांचं बोईसर परिसरात शिंदे रुग्णालय आहे.

कोरोना काळातील पेंडिंग असलेल बिल मागत असल्याने समीर मोरे यांनीही बेदम मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरकडून करण्यात आला आहे. या मारहाणीत डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गुजरातमधील वापी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा : फडणवीस रात्री उशीरा शिंदेंच्या भेटीला; 1 तासाच्या चर्चेनंतर तडकाफडकी गेले, चर्चांना उधाण

सध्या बोईसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या मारहाणीनंतर बोईसर आणि परिसरातील डॉक्टर कडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. दरम्यान पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास रुग्णालयं बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाईल असा इशारा डॉक्टरांच्या संघटनांकडून देण्यात आला आहे .

हे ही वाचा : काल बॅनर आज थेट मोठी ऑफर; आव्हाडांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला शिंदे गटात जाणार?

याच प्रकरणात मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी मागील दोन दिवसांपूर्वी देखील या हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली होती या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही बोईसर पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्याने पुन्हा ही जबर मारहाण झाल्याचा आरोप बोईसर मधील डॉक्टरकडून करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, MNS, Palghar, Private hospitals