जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या..." महायुतीवर मनसे आमदाराचं मोठं वक्तव्य

आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या..." महायुतीवर मनसे आमदाराचं मोठं वक्तव्य

आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या..." महायुतीवर मनसे आमदाराचं मोठं वक्तव्य

मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्याने आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरला शिवाजी पार्क येथे दिपोत्सव आयोजित केला. या दीपोत्सव सोहळ्यास 21 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी उपस्थिती लावली. यानंतर मनसे, भाजप आणि शिंदे गट या तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या महायुतीच्या चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले आमदार राजू पाटील - युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. त्यांनी निवडणुका स्वबळावर लढावे, असे आदेश दिले आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र, साहेबांनी जर युती करायला सांगितली तर तीसुद्धा करायला आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, असे महत्त्वाचे विधान आमदार राजू पाटील यांनी केले आहे.दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या चर्चांना उधाण आले आहे. मनसेचा दिपोत्सव - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिंदेंचा पक्ष हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असताना शिवाजी पार्कवर 21 ऑक्टोबरला या महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळाली. पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर आले.

News18लोकमत
News18लोकमत

यानिमित्ताने महायुतीचे दर्शन झाले. मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्याने आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा -  तुम्ही रात्री, अपरात्रीही भेटायला आला तरी आम्ही भेटणार, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी आज सकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची भेट घेतली. दिवाळीचा पहिला दिवस आणि डोंबिवली तील फडकेरोड यांचे एक अतूट नाते आहे. ते या फडकेरोडवर उसळलेला जनसागर पाहून आजही पुन्हा दिसून आले. आमदार झालो तरी फडकेरोडवर आलो की जुन्या आठवणी ताज्या होतात. डोंबिवलीकर आणि फडकेरोड हे एक वेगळ समीकरण आहे, असे मत यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात