Home /News /maharashtra /

'...म्हणून 2005 साली बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला गेले'', MNS नेत्याचा मोठा खुलासा

'...म्हणून 2005 साली बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला गेले'', MNS नेत्याचा मोठा खुलासा

शनिवारी उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

    मुंबई, 15 मे: शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा मुन्नाभाई असा उल्लेख केला. त्यांनी चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या डोक्यात केमिकल लोच्चा झालाय तशी राज ठाकरेंची गत झाल्याची टीका केली. यावरुन मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुम्ही ज्या मार्गाने सत्ता मिळवली त्याचं समर्थन केलं ते योग्य नाही. माणसाचा स्वभाव असतो तो जात नाही. टोमणे मारणं हे प्रकार सुरु होते. संजय राठोड, यशवंत जाधव या प्रकरणावर काहीही बोलले नाही. ज्या लोकांनी भाजपा-शिवसेना युती केली. त्यात प्रमोद महोजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे होते. पण आता तुम्ही युतीत सडलो बोललात म्हणजे बाळासाहेब चुकीचे होतं असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं का? असा सवाल मनसे नेते प्रकाश महाजन(MNS Prakash Mahajan) यांनी सवाल केला आहे. लोकमतनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, आपल्या जन्मदात्रीला दिलं हे खास 'Gift'  पुढे प्रकाश महाजन म्हणाले की, मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळेलं. मुन्नाभाई गांधीजींचा अभ्यास करतो म्हणून त्याला गांधी दिसले. बाळासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाली तरी तुम्ही कधी त्यांना दिसल्याचं बोलला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वेगळं नातं होतं. आज पुत्रप्रेमाचा डंका ते वाजवत आहेत. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे दिसत असतील तर केमिकल लोचा कसा? असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. मनसे नेत्याचा गौप्यस्फोट 26 जुलै 2005 रोजी ज्यावेळी मुंबईत महापूर आला तेव्हा उद्धव ठाकरे पत्नी मुलांसह हॉटेलला राहायला गेले. तेव्हा बाळासाहेबांना कुठे सोडलं होते? तेव्हा बाळासाहेब मोठ्या हक्कानं कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे राहायला आले होते, असा गौप्यस्फोट प्रकाश महाजन यांनी केला आहे. तसंच गुरु-शिष्य अशी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचं नातं होते. ही आठवण सांगितलेली राज ठाकरेंना आवडणार नाही, मी त्यांचा ओरडा खाईन पण हे सांगायला हवं. पण ही सत्य घटना आहे. डंका पिटून हिंदुत्व होत नाही, असं प्रकाश महाजनांनी म्हटलं आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे "मला एका शिवसैनिकाने सांगितलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं लगे रहो मुन्नाभाईचा संबंध काय? मी म्हटलं हो थोडासा पाहिला आहे. का रे? म त्याच्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. तो त्यांच्याशी बोलतो. मी म्हटलं, मग? नाही म्हणे तशी एक केस आपल्याकडे आहे. म्हटलं कोणती केस? अहो तो नाही का ज्याला स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. कधी मराठीच्या नादात लागतात, तर कधी हिंदुत्वाच्या नादात लागतात", असं उद्धव ठाकरे म्हणाले. "मी म्हटलं, अरे त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. कुणाला त्याच्या भ्रमात राहु द्याना. पण तुम्ही त्या चित्रपटाच्या शेवट नाही बघितला म्हणे. म्हटलं काय? शेवटी संजय दत्तला कळतं की साला अपून के भेजेमे केमिकल लोचा होएला है. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हे असे मुन्नाभाई फिरत आहेत तर फिरु देत. आता कुणाला अयोध्याला जायचंय ते जाऊदे. आदित्यदेखील चालला आहे. गेल्या आठवड्यात तो तिरुपतीला गेला होता", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Raj Thackeray (Politician), Uddhav Thackeray (Politician), Uddhav thackeray Full Speech

    पुढील बातम्या