मुंबई, 28 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. यानंतर भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं आहे. यातच आता राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करत राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी फेसबुकवर काय म्हटले? ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी”! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना." या शब्दात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गुढीपाडवा सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. या सभेला विरोधही होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री याबाबत आधीच म्हणाले की… काही राजकीय पक्षांनी भोंग्यांसंदर्भात डेडलाईन दिली आहे. मात्र, भोंगे काढण्यासंदर्भात सरकार काही करणार नाही. ज्यांनी भोंगे लावले असतील तेच यांसंदर्भातील निर्णय घेतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका नाही. केंद्र सरकारनं देश पातळीवर एक नियम करावा आणि नियमांची अंमलबावणी देशभर करावी, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यांवर बंदी घातली आहे आणि इतर वेळी आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं.