Home /News /maharashtra /

राज ठाकरेंनी नारायण राणेंना मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा, फोनवरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

राज ठाकरेंनी नारायण राणेंना मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा, फोनवरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

Narayan Rane- Raj Thackeray Call: नारायण राणे यांचा फोन अखेर लागला आहे. राज ठाकरे यांनी फोनवरून राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या.

    मुंबई, 12 जुलै: गेल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. मोदींनी नारायण राणेंकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (MNS Chief Raj Thackeray) राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. पण त्यांचा फोन बंद होता, असं राज ठाकरेंनी सांगितलं. काल पुण्यात बोलताना त्यांनी सांगितलं. मात्र आज नारायण राणे यांचा फोन लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. हेही वाचा- लोणावळ्यात पर्यटकांचा दारु पिऊन तमाशा, फोडल्या पोलीस चौकीच्या काचा काय म्हणाले होते राज ठाकरे राज ठाकरेंनीही राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. काल पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की, मी शुभेच्छा देण्यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र दोघांचेही फोन बंद होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन त्यांना शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे म्हणाले होते. आज लगेचच राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, MNS, Narayan rane, Raj Thackeray

    पुढील बातम्या