जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा, विधान परिषदेचे सभापती राज्यपालांसमोर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा, विधान परिषदेचे सभापती राज्यपालांसमोर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा, विधान परिषदेचे सभापती राज्यपालांसमोर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार?

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : मुंबईतून (Mumbai) एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोंविद (Ramnath Kovind) हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन झाले. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) घटकपक्षांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: मुंबईत राजभवन (Raj Bhavan) येथे आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) राजभवनात दाखल झाले आहेत. हे दोन्ही नेते राष्ट्रपतींची भेट घेऊन भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबद्दल निर्णय घेत नसल्याने नाराजी व्यक्त करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कोश्यारींची शिष्टमंडळाला कोपरखळी या दरम्यान, एक गंमतीदार किस्सा यावेळी घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रामराजे निंबाळकर, नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींकडे तक्रारीसाठी आले असल्याची खबर भगतसिंग कोश्यारी आंच्या स्वीय सहाय्यकाला मिळाली. त्यांनी तातडीने राज्यपालांना याबाबतची कल्पना दिली. सर्व शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी वाट पाहत असतामा राज्यपालांनी बोलावून घेतलं आणि सर्वांना चहा पाजला. यावेळी चहा देताना त्यांनी शिष्टमंडळाला कोपरखळी मारली. “शिकायत करने आए है तो क्या हुआ, चाय तो पी ही सकते है”, असं राज्यपाल म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभापती रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया दरम्याम, रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पावसाळी आधिवेशनामध्ये गदारोळ केल्याप्रकरणी 12 आमदरांचं निलंबन करण्यात आलं. मात्र 12 आमदार सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं. गेल्या 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आहे. यामुळे आमच्यासमोर काही प्रश्न उभे राहीले आहेत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी यापूर्वी कोणताही हस्तक्षेप केला नाही. आमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की, सुप्रीम कोर्टाचा अनादर करणे आणि प्रश्न कडवट करणे हे आम्ही न करायचं ठरवलं. यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्विकारला आणि कोणतंही भाष्य आम्ही केलं नाही”, असं रामराजे म्हणाले. ( कोर्टाने कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया ) “सरकारने मांडलेले ठराव मतदान घेऊन काम करायचं काम आम्ही करत असतो. आम्ही राष्ट्रपतींना भेटून त्यांना आमची शंका जाऊन सांगितली. त्यांनी आम्हाला वेळ दिला. आमची आणि राष्ट्रपतींचा 15 मिनिटांचा संवाद झाला. “आम्हाला राष्ट्रपतींनी सांगितल कि मी तपासून घेतो”, असंही रामराजे निंबाळकर म्हणाले. राज्यपालांवर ‘सामना’ अग्रलेखातून टीका महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यात विविध मुद्द्यांवरुन वाद झाल्याचं पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून राज्यपालांवर टीका करण्यात आली होती. सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलेलं होतं? आमदारांच्या नियुक्त्यांबाबत सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नक्की काय करायला हवे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचे, की आणखी काही करायचे? मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवूनही राज्यपाल निर्णय गेत नाहीत. त्यांना स्मरणपत्र पाठवूनही 12 सदस्यांची फाईल पुढे सरकत नाही. म्हणजे नक्कीच त्यांचे मन साफ नाही आणि 12 आमदारांच्या नियुक्त्या करू नका असा त्यांच्यावर ‘वर’चा दबाव आहे. ‘निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?’ “सरकारने 12 नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवानातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे. राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही व त्यांच्या इज्जतीशी सध्या त्यांचेच लोक खेळ करत आहेत. 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप आणि राज्यपाल स्वत:चेच हसे करुन घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे”, असंही अग्रलेखात म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात