नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 26 जानेवारी : 'मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता, पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला' असा खुलासा काँग्रेसमधून निलंबित झालेले सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अखेर अपक्ष अर्ज का भरला याचा खुलासा पहिल्यांदाच तांबे यांनी केली.
'सगळ्या लोकांचा मला पाठिंबा असून सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझा फॉर्म अपक्ष भरावा लागला, असं सत्यजित तांबे म्हणाले.
(शिवसेना-वंचित युतीनंतर महाविकासआघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीचा ठाकरेंना अल्टिमेटम!)
दरम्यान, 'वडील व मुलाच्या मतभेदामुळे पक्षाची मोठी हानी होत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं, या टीकेवर 'वेळ येईल तेव्हा बोलेल' असं म्हणत सत्यजित तांबे यांनी बोलणं टाळलं.
'निवडणूक चार दिवसांवर येऊनही भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा दिलेला नाही मात्र मला या विषयावर काही माहिती नसल्याचे म्हणत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या या प्रश्नावर सत्यजीत तांबे यांनी बगल दिली आहे.
(शिंदेंनंतर मित्रांनीच ठाकरेंना खिंडीत गाठलं! पवार-आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?)
तसंच, डॉ. सुधीर तांबे यांचे जळगाव जिल्ह्यातील लोकांची अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून त्यामुळे सर्वकाही विसरून जळगाव जिल्ह्यातील मतदार आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे. भुसावळ येथील लोणारी मंगल कार्यालयात सत्यजित तांबे यांचा प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक संघटनांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.