मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MLA Samadhan Autade : भाजपनेच भाजपचा काटा काढला, पंढपुरात साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे पराभूत

MLA Samadhan Autade : भाजपनेच भाजपचा काटा काढला, पंढपुरात साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे पराभूत

मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. आमदार व विद्यमान अध्यक्ष समाधान अवताडेंना मोठा धक्का बसला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. आमदार व विद्यमान अध्यक्ष समाधान अवताडेंना मोठा धक्का बसला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. आमदार व विद्यमान अध्यक्ष समाधान अवताडेंना मोठा धक्का बसला आहे.

  सोलापूर, 15 जुलै : राज्यातील सहकारी कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीत काही ठिकाणी निवडणुकात बिनविरोध होत आहेत तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या निवडणुका होताना दिसत आहेत. दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा काल (दि.15) निकाल लागला या निवडणुकीत आमदार व विद्यमान अध्यक्ष समाधान अवताडेंना मोठा धक्का बसला आहे. (MLA Samadhan Autade)

  दामाजी कारखान्यात झालेल्या निवडणुकीत पंढरपुरमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्कामानला जात आहे. यापूर्वी दामाजी कारखान्याच्या चाव्या आमदार समाधान अवताडेंच्याकडे होत्या ते या कारखान्याचे अध्यक्षही होते त्यांनाही या कारखान्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आमदार आवताडे गटाला २१ पैकी फक्त २ जागेवरच समाधान मानावे लागले आहे.'

  हे ही वाचा : फडणविसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊतांचा दौरा, नागपुरात भेट होण्याची शक्यता

  दरम्यान झालेल्या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार समाधान आवताडे, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्यासह जवळपास 10 संचालकांनाचा पराभव झाला असल्याने पंढरपूरमध्ये भाजपला धक्का मानला जात आहे. दरम्यान समविचारी गटातून तानाजी खरात, शिवानंद पाटील , भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांच्यासह १९ जण विजयी झाल्याने भाजपनेच भाजपचा पराभव केल्याचे बोलले जात आहे.

  या कारखान्याच्या निकालाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष राहिले होते. काल (दि.14) येथील शासकीय धान्य गोदामामध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून समविचारी आघाडीच्या पॅनेलने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या पूर्व भागातील धरमगाव, ढवळस, उचेठाण बठाण, मूढवी, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी या भागात माजी आमदार प्रशांत परिचारक व स्व. आ. भारत भालके यांच्या समविचारी आघाडीला वर्चस्व राखण्यात यश आले. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात देखील मताधिक्य वाढत गेल्याने अवताडे गटाचा पराभव निश्चित मानला गेला.

  हे ही वाचा : ...जेव्हा मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर आला एकनाथ शिंदेंचा फोन, शिवसैनिकानं सांगितला भावुक अनुभव

  पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून समाधान आवताडे हे रिंगणात होते. यावेळी त्यांना विधानसभेमध्ये प्रशांत परिचारक यांच्या पाठिंबावर विजय संपादन करता आला होता. मात्र यानंतर समन्वयाअभावी परिचारक यांच्या समर्थकांनी साखर कारखान्यांमध्ये भालके यांच्या गटाशी हात मिळवणी करत तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात झाली सकाळच्या सत्रात पावसाची सुरुवात असल्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये उत्साही कार्यकर्त्यांचा उपस्थिती कमी राहिली होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pandharpur, Pandharpur (City/Town/Village), Pandharpur news, Vitthal mandir pandharpur

  पुढील बातम्या