नेहाल भुरे (भंडारा), 04 डिसेंबर : सुषमा ताई ह्या अर्धवट ताई त्यांना कोणतीही माहिती अर्धवट असल्याच्या पलटवार शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संपत्तीचे विवरण देत अमाप पैसे कमावल्याचा आरोप केला होता. यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.
यावेळी आमदार भोंडेकर म्हणाले की, सुषमा ताई ह्या अर्धवट ताई त्यांना कोणतीही माहिती अर्धवट असल्याच्या पलटवार शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संपत्तीचे विवरण देत अमाप पैसे कमावल्याचा आरोप केला होता.
हे ही वाचा : राज्यपालांचा बोलवता धनी कोण? राज ठाकरेंनी सांगितली हकीकत
त्यांच्याकडे अर्धवट माहिती असल्याने त्या अर्धवट ताई असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी काय दिले? यासह भंडाऱ्याच्या विकासावर सुषमा ताईंनी बोलायला पाहिजे असं म्हंटलं. अर्धवट सुषमा अंधारे यांच्यामुळे शिल्लक राहिलेली शिवसेना पूर्ण घालवेल, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळेत आवरले नाही तर, उरलेली शिवसेनाही राहणार नाही असे भोंडेकर मनाले आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबद्दल विचारले असता आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत. शिवसेना थकलेली नाही. नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चार-दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : ‘स्टेअरिंग माझ्याच हाती’ फडणवीसांनी कार चालवली अन् शेजारी बसले मुख्यमंत्री शिंदे, VIDEO
शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे वोटर आहेत. ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आल्याचे त्यांनी सांगितलं.