जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमदार बच्चू कडूंची वेगळी चूल? प्रहार व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार; शिंदे-फडणवीसांवर आरोप

आमदार बच्चू कडूंची वेगळी चूल? प्रहार व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार; शिंदे-फडणवीसांवर आरोप

आमदार बच्चू कडूंची वेगळी चूल?

आमदार बच्चू कडूंची वेगळी चूल?

आमदार बच्चू कडू यांची प्रहार आणि मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार असल्याचे कडू यांनी जाहीर केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 6 जानेवारी : राज्यात पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाविकास आघाडीकडून काही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीच भूमिका समोर आलेली नाही. अशातच युतीमधील आमदार बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्याचं ठरवल्याचे दिसत आहे. आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप-शिंदे गटसोबत लढणार होतो. पण, दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. दखल न घेतल्याने वेगळा निर्णय : बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. प्रहार संघटना व मेस्टा संघटनांकडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली. आमचे 2 लाख मतदार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील नंतर काय होते ते बघून घेऊ, अशी आक्रमक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांना बच्चू कडू यांच्याकडून घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे. वाचा - Video : सरकारविरोधात बोलल्या म्हणून? भरकार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपरेंचा माईकच केला बंद कसा आहे निवडणूक कार्यक्रम? जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पाच जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. 12 जानेवारी पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 13 जानेवारीला अर्जाची छाननी होईल. माघारीसाठी 16 जानेवारी अंतिम मुदत आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विभागातील पाचही जिल्ह्यांत सर्वाधिक नोंदणी नगर जिल्ह्यातून झाली आहे. गेल्या वेळी ती नाशिक जिल्ह्यातून झाली होती. नगर जिल्ह्यातूनही सर्वाधिक नोंदणी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून झाली आहे. सध्या राज्य पातळीवर वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये युतीचे राजकारण शिजत आहे. त्यातून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार का याबद्दलची चर्चा सुरू आहे. असे असतानाही काँग्रेसच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात