Home /News /maharashtra /

अत्याचारातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसूती; शिवसेना नेत्याच्या 2 मुलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल

अत्याचारातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसूती; शिवसेना नेत्याच्या 2 मुलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल

मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे खळबळजनक घटना घडकीस आली आहे. येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसूती (Minor girl give birth a child in home) केली आहे.

    महाबळेश्वर, 24 सप्टेंबर: मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे खळबळजनक घटना घडकीस आली आहे. येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसूती (Minor girl give birth a child in home) केली आहे. एवढंच नव्हे तर संबंधित प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी संबंधित बाळ मुंबईतील एका कुटुंबाला दत्तक म्हणून दिलं आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोन युवकांसह चार जणांना अटक केली आहे. शिवाय हे प्रकरण दडपण्यासाठी मदत करणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल (FIR lodged against 13) करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रकरणात शिवसेना नेते (Shivsena leader) डी एम बावळेकर (DM Bawalekar) यांच्या दोन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर महाबळेश्वरातीलच आबा उर्फ सागर गायकवाड आणि अशितोष बिरामणे या दोन युवकांनी अत्याचार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली. हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी तीची प्रसूती घरातच केली होती. तसेच जन्माला आलेलं बाळ मुंबईतील कांदीवली येथील सुनिल चौरासीया यांना दिलं होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी सागर गायगवाड आणि आशितोष बिरामणे या दोघांना अटक केली आहे. हेही वाचा-मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून झाला फरार; हनीट्रॅपचा वापर करत नराधमाला अटक अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना नेते डी एम बावळेकर यांचा मुलगा योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर यांच्या मदतीने त्यांनी हे बाळ दत्तक म्हणून कांदीवली येथील चौरासिया कुटुंबाला दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणात शिवेसेना नेते डी एम बावळेकर यांच्या दोन्ही मुलांसह 9 नऊ जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हेही वाचा-येरवडा कारागृहातून पत्नीला पाठवल्या 33 चिठ्ठ्या; गुन्हेगारी टोळी ठेवली सक्रिय आरोपींनी अत्याचारातून जन्मलेलं बाळ बॉंडवरून लेखी लिहून घेत आनंद हिरालाल चौरसिया, सुनिल हिरालाल चौरसिया आणि पूनम हिरालाल चौरासिया या कुटुंबाला दिलं होतं. हा बॉन्ड शिवसेना नेते डी एम बावळेकर यांचा मुलगा सनी उर्फ सत्विक दत्तात्रय बावळेकर यांनी खरेदी केला होता. हा बेकायदेशीर व्यवहार महाबळेश्वरातील एका हॉटेलमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. याप्रकरणी बाँन्ड लिहून घेणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे बाळ मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या शेजारी आता पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संबंधित बाँडवर सर्व आरोपींच्या सह्या असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape on minor, Shivsena

    पुढील बातम्या