मुंबई, 24 सप्टेंबर: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape on minor girl) करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी हनीट्रॅपचा वापर करत अटक (Rape accused arrested using Honeytrap) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा परिसरातील तुळिंज पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. संबंधित नराधम आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच तो सातत्याने आपली ठिकाणं बदलत होता. त्यामुळे तुळिंज पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने हनीट्रॅपचं जाळ टाकून आरोपीला अटक केली आहे. सूरज सारसद असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झाला होता. तुळिंज पोलिसांनी फरार आरोपी सूरजचा अनेक ठिकाणी शोध घेतला. पण त्याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. तुळिंज पोलिसांनी पालघर आणि ठाण्यातील सूत्रांना अक्टिव्ह केलं. तरीही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आरोपी सतत आपला मोबाइल बंद-चालू करत पोलिसांना गुंगारा देत होता. हेही वाचा- मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार त्यामुळे तुळिंज पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यानंतर नराधम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नराधम आरोपी सोशल मीडियाचा वापर करत महिलांना आणि अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी महिला पोलिसाची मदत घेत आरोपीला आपल्या हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढलं होतं. हेही वाचा- सातारा: घरात घुसत मुलीचं तोंड दाबून चिरला गळा; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट सोशल मीडियाच्या माध्यमातून नराधम आरोपी महिला पोलिसाच्या संपर्कात आल्यानंतर, तो महिलेला भेटण्यासाठी ठाण्यातील आनंद नगर परिसरात आला होता. दरम्यान तुळिंज पोलिसांनी सापळा रचून नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास तुळिंज पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.