• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • हृदयद्रावक! अतिवृष्टीने पिकं सडली; तरुण शेतकऱ्यानं बॅरेजमध्ये उडी घेत संपवलं जीवन

हृदयद्रावक! अतिवृष्टीने पिकं सडली; तरुण शेतकऱ्यानं बॅरेजमध्ये उडी घेत संपवलं जीवन

Suicide in Latur: लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील डोंगरगावातील एका 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने बॅरेजमध्ये उडी घेत (Jump into barrage) आत्महत्या (Young farmer commits suicide) केली आहे.

 • Share this:
  लातूर, 07 ऑक्टोबर: लातूर (Latur) जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील डोंगरगावातील एका 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने बॅरेजमध्ये उडी घेत (Jump into barrage) आत्महत्या (Young farmer commits suicide) केली आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील शेतीतील सर्व पिकं सडून गेल्यानं संबंधित तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.   शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अजय विक्रम बन असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याचं नाव असून तो शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगावातील रहिवासी आहे. मृत अजय याची नदीच्या काठावर चार एकर जमीन आहे. त्यांनी हजारो रुपये खर्च करून चारही एकरात पेरणी केली होती. पण अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला होता. यामुळे अजय यांच्या 4 एकर शेतीतील सर्व पिकं सडून गेली होती. खरीप हंगामातला हाता-तोंडाला आलेला घास अस्मानी संकाटाने हिरावून घेतला होता. हेही वाचा-मांडूळच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून नूकसान भरपाई म्हणून संबंधित शेतकऱ्याला चार एकरसाठी केवळ 7 हजार रुपये मिळाले होते. तुटपुंजे  पैसे मिळाल्याने अजय याने आपल्या घरी दिवाळीचा सण देखील साजरा केला नाही. दुसरीकडे, त्याच्याकडे दोन बँकेचे मिळून एकूण 8 लाख रुपयांचं कर्ज होतं. हे कर्ज कसं फेडायचं याची चिंता अजयला होती. या आर्थिक विवंचनेतून अजय याने डोंगरगाव येथील बॅरेजमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. हेही वाचा-नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला;चॉपरने वार करत केलं रक्तबंबाळ या घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यानंतर शोधमोहीम राबवत पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृत अजयचा मृतदेह बाहेर काढला आहे. अवघ्या 24 व्या वर्षीय तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अजय हा विवाहित असून त्याला 6 महिन्यांचा मुलगा देखील आहे. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: