चंद्रपूर, 05 नोव्हेंबर: यावर्षीय कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भाला देखील अतिवृष्टीचा (Heavy Rainfall in Maharashtra) फटका बसला आहे. मान्सूनच्या शेवटी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी (Cloudburst) सदृश्य कोसळलेल्या या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकांसह वाहून गेली होती.
हाता-तोंडाला आलेला घास अस्मानी संकटांनी असाप्रकारे हिरावून नेल्याने अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतीचं नुकसान झाल्यानंतर डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? या आर्थिक विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. अशात चंद्रपुरातून देखील शेतकरी आत्महत्येच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे.
हेही वाचा-दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये आनंद, या 9 कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच सोडली साथ
ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्रपुरात (Chandrapur) तीन शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट (3 farmers commits suicide) केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथे 25 वर्षीय तरुण शेतकरी वैभव अरुण फरकडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चेक पिपरी येथील 34 वर्षीय शेतकरी महेश भास्कर मारकवार यांनी विषारी औषध प्राशन (Farmer suicide by drink poison) करत ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. तरुण शेतकऱ्यांनी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा-पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या, पुणे हादरलं
तिसऱ्या एका घटनेत, चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंड पिपरी तालुक्यातील किरमीरी येथील बंडू रामटेके यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मृत रामटेके यांच्या सोयाबीनच्या ढिगाला आग लागल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Crime news, Suicide