मुंबई, 28 ऑगस्ट : महाविकास आघाडीकाळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती देत संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडी काळात जोरदार आरोप झाले होते. भाजप आणि शिंदे गटाची युती झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणं नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
हे ही वाचा : Mohit Kamboj vs NCP : मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी, आणखी एका बड्या महिला नेत्यांना दिला इशारा
आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असं ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे.
आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली.व ती पॉझिटिव्ह आली.डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे.माझ्या संपर्कात आलेल्याना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) August 27, 2022
शनिवारी संजय राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी केली. त्यांच्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर राठोड हे घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात जे आले आहेत, त्यांनी काळजी घ्या, कोरोना चाचणी करून घ्या असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हे ही वाचा : 65 वर्षीय वृद्धाने पाळीव श्वानावर केले अनैर्गिक अत्याचार, VIDEO स्टिंग ऑपरेशनमुळे घटना उजेडात
‘आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असं ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Sanjay rathod