जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! ...म्हणून आता थेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क

मोठी बातमी! ...म्हणून आता थेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क

मोठी बातमी! ...म्हणून आता थेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क

सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन खाणींना पाठिंबा दिल्यामुळे धर्मराव बाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

  • -MIN READ Gadchiroli,Maharashtra
  • Last Updated :

गडचिरोली, 20 जुलै, उदय तिमांडे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. धर्मराव बाबा आत्राम यांना धमकी देण्यात आल्यानं गडचिरोली पोलीस विभाग सतर्क झाला आहे. सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन खाणींना पाठिंबा दिल्यामुळे धर्मराव बाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना धमकी देण्यात आली आहे. दरम्यान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना सध्या झेड सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा कुठलाही प्रश्न नाही. नक्षलवाद्यांच्या धमक्यांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया यावर गडचिरोली परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,गडचिरोली जिल्ह्यात जी विकास कामं होत आहेत, त्या विकास कामांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. बंदूकीच्या जोरावर लोकांना एकत्र करुन आंदोलन केलं जात आहे. नक्षलवाद्यांचा स्ट्रॉग होल्ड असलेल्या तोडगट्टा गावाच्या एण्ट्री पॉईंटवर हे आंदोलन सुरू आहे. त्या भागात पोलीसांची वर्दळ वाढू नये म्हणून नक्षलवादी विकास कामांना विरोध करत असल्याचंही संदीप पाटील यांनी म्हटलं आहे. BJP : उद्धव ठाकरेंच्या वादग्रस्त टीकेनंतर भाजप आक्रमक, नागपूरमध्ये पोस्टर फाडले पोलीस विभाग सर्तक नक्षलवाद्यांकडून आता थेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनाच धमकी देण्यात आल्यानं पोलीस विभाग सतर्क झाला आहे. आत्राम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील सहा नवीन खाणींना पाठिंबा दिल्यानं नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात