मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिर्डी साई मंदिरात फुल-हार नेण्यास बंदी, निर्णयाला विरोध करत दुकानदारांचे अनोखे आंदोलन

शिर्डी साई मंदिरात फुल-हार नेण्यास बंदी, निर्णयाला विरोध करत दुकानदारांचे अनोखे आंदोलन

साईमंदिरात फुल-हार नेण्यास बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.

साईमंदिरात फुल-हार नेण्यास बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दोन वर्षे आधी साईमंदिरात भाविकाना फुल हार प्रसाद अशी पुजा सामुग्री नेण्यास तसेच समाधीवर चढवण्यास कोणतीही बंदी नव्हती.

  • Published by:  News18 Desk
सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 17 ऑगस्ट : साईमंदिरात भाविकांना फुल हार प्रसाद नेण्यास साईसंस्थानने बंदी घातली आहे. फुल-हारांमुळे भाविकांची लुट होते तसेच मंदिरात अस्वच्छता निर्माण होत असल्यानं विश्वस्त मंडळाने फुल-हार बंदीचा ठराव पारित केला आहे. तर या ठरावानंतर याला शिर्डीतून फुल विक्रेते, फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना पुजा सामुग्री नेवू द्यावीत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोख आंदोलन छेडले आहे. कोपरगाव ते शिर्डी 18 किमी पाया फुलांची टोपली घेऊन ते फुल बाबांच्या व्दारकामाई समोर अर्पण करत मुख्य कार्यकारी अधिकारींच्या नावाने घोषणा दिल्या. यात आंदोलनात फुल विक्रेते, उत्पादक शेतकरी यांनी सहभाग घेतला. कोरोनाच्या दोन वर्षे आधी साईमंदिरात भाविकाना फुल हार प्रसाद अशी पुजा सामुग्री नेण्यास तसेच समाधीवर चढवण्यास कोणतीही बंदी नव्हती. भाविक फुलांचे हार , गुलाबाची गुच्छ साईबाबांना चढवत असत. मात्र, कोरोनानंतर मंदिर भाविकांसाठी बंद झाले. तेव्हापासून मंदिरात फुले नेण्यास बंदी आहे. कोरोना नियमात शिथिलता आली आणि शिर्डीतील सर्व काही पुर्वपदावर आले. मात्र, साईबाबा समाधीवर फुले चढवणे सुरू झाले नाही. त्यामुळे फुले विक्रेते, प्रसाद व्यावसायिक अर्थिक अडचणीत सापडल्याचं बोलले जात आहे. फुलांची मोठी बाजारपेठ  शिर्डी साईबाबा मंदिरात फुले चढवण्यात येतात, त्यामुळे येथे फुलांची मोठी बाजापेठ आहे. पंचक्रोषीत जवळपास शंभर एकरात फुलांची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने लहान शेतकरी आहेत, जे दररोज फुले बाजारात आणून आपला उदरनिर्वाह करतात. दररोज सकाळी फुलांचे लिलाव होवून व्यावसायिक फुले विकत घेतात. त्याचे हार आणि गुच्छ बनवून ते भाविकांना विकले जाते. फुले विक्रेत्यांचा देखील मोठा व्यवसाय असून यावर फुल ओवणी करणाऱ्या, हार , गुच्छ विकणारे अशी अनेकांचे कुटूंब अवलंबून आहेत. साई समाधीवर फुले चढवू द्या - फुल-हार साई मंदिरात सुरू करावेत, यासाठी पुकारलेल्या आंदोलनात शेतकरी आणि व्यावसायिकांनी देखील सहभाग घेतला आहे. संजय काळे यांनी टोपलीत फुले आणत ती व्दारकामाई समोर रस्त्यावर वाहिली. तर त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाने घोषणा देत फुलांवरील बंदी उठवावी , गेल्या दोन वर्षापासून फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. फुल शेतात सडून चालली असून ही बंदी उठवावी तसेच भाविकांना साई समाधीवर फुले अर्पण करू द्यावीत, अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे. हेही वाचा - Ahmednagar Crime : भाजप -राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार फुल बंदीवर संस्थानची भूमिका फुल-हार बंदीसाठी साई संस्थानची भूमिका स्पष्ट आहे. फुल-माळांच्या निमित्ताने भाविकांच्या भावनांचा आधार घेत त्यांची लुट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्या आहेत. दोनशे रुपयांची फुल माळ दोन हजारांना विकणे, यामुळे भाविकांची फसवणूक होत होती. तसेच समाधीवर चढवलेली फुले गर्दीत भाविकांच्या हातून मंदिरात पडत असल्यानं ती पायदळी तुडवली जात. यामुळे एक प्रकारे फुलांचा चिखल तयार होत आहे. यामुळे अस्वच्छता होत असून सफाईसाठी अधिक वेळ  लागतो आणि याचा परिणाम भाविकांच्या दर्शन वेळेवर होत असल्याने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने फुल हार बंदीचा ठराव करुन अंमलात आणल्याचे साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी स्पष्ट केले आहे.
First published:

Tags: Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi, Shirdi news

पुढील बातम्या