मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

रविवारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam)  पार पडणार होती. मात्र पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनं (State Government)  मोठा निर्णय घेतला आहे.

रविवारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam) पार पडणार होती. मात्र पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनं (State Government) मोठा निर्णय घेतला आहे.

रविवारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam) पार पडणार होती. मात्र पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनं (State Government) मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

ठाणे, 13 डिसेंबर: रविवारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam) पार पडणार होती. मात्र पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनं (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे म्हाडा बाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदारांऐवजी स्वत:च परीक्षा घेईल,असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य सरकारनंही स्वत:च परीक्षा घेण्याचं धोरण राबविणं गरजेचं असल्याचं मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

परीक्षा रद्द केल्यानं परिक्षार्थ्यांना त्रास देखील सहन करावा लागला. मात्र परिक्षार्थ्यांकडून परीक्षेसाठी आकारलेले शुल्क हे म्हाडाकडून परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पुढे म्हाडातर्फे होणाऱ्या परीक्षेसाठी कुठलीही फी आकारली जाणार नसल्याचं देखील आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- 5 वेळा पलटली फॉर्च्युनर, Shocking Live Video आला समोर

पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ते नामुष्कीचे ठरलं असतं. याशिवाय अभ्यास केलेल्या परीक्षार्थींवर अन्याय झाला असता, असं आव्हाड म्हणाले.

पुढे आव्हाड यांनी सांगितलं की, पोलिसांनी ज्या तीन जणांना ताब्यात घेतलं त्या तीन जणांमधील दोन जण हे आरोग्य खात्याच्या पेपर फुटीत सामील होते. या प्रकरणात ज्यांना म्हाडाच्या पेपरचे काम दिले होते, त्यांचा मालक सापडला. त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्रश्नपत्रिका आढळली आहे.

ही परीक्षा रद्द करण्यात आली असून वशिलेबाजीला फाटा देऊन हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. परीक्षा रद्द केल्याबद्दल आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली आहे.

पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना पोलीस कोठडी

या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा- गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळलं आहे.

First published:

Tags: Jitendra awhad, Mhada 2022