मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MHADA करणार तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण; 8984 घरांसाठी बंपर लॉटरी, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज

MHADA करणार तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण; 8984 घरांसाठी बंपर लॉटरी, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज

आपल्या स्वप्नातलं घर घरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाकडून कोकण मंडळात घरांसाठी बंपर लॉटरी करण्यात येत आहे.

आपल्या स्वप्नातलं घर घरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाकडून कोकण मंडळात घरांसाठी बंपर लॉटरी करण्यात येत आहे.

आपल्या स्वप्नातलं घर घरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाकडून कोकण मंडळात घरांसाठी बंपर लॉटरी करण्यात येत आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 22 ऑगस्ट : आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर घरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे अर्थात म्हाडा (MHADA)कडून कोकण विभागात तब्बल 8 हजार 984 घरांसाठी बंपर लॉटरी (MHADA annouced 8984 houses lottery in Konkan division) काढण्यात येत आहे.

कुठे करावा अर्ज?

या घर घरेदीसाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी नागरिकांनी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. म्हाडाच्या वेबसाईटवर घरांच्या लॉटरी संदर्भात मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिका वाचून घ्यावी.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची सुरुवात 24 ऑगस्ट 2021 पासून सुरू

अर्ज नोंदणीची सुरुवात - 24 ऑगस्ट 2021 दुपारी 12 वाजल्यापासून

ऑनलाईन अर्ज - नोंदणीकृत अर्जदार 24 ऑगस्ट 2021 रोजीच दुपारी 3 वाजेल्यापासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत

केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांना अश्रू अनावर, सासूंच्या गळ्यात पडून रडल्या VIDEO

कुठल्या विभागात किती घरे?

कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 8 हजार 984 घरांसाठी लॉटरी काढण्यात येत आहे. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 6 हजार 180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 624 सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 586 सदनिका, सर्व्हे क्रमांक 162 खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 2016 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथे 1769 सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) 15 सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील 1 हजार 742 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथील 88 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे 36 सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 2 सदनिका, सर्व्हे क्रमांक 216 पीटी, 221 पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे 196 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक 491, 23 पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 1 सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे 8, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे 76 सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे 23 सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) 16 सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे 2 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे 16 सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे 116 सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे 35 सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे 28 सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे 140 सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे 21 सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे 24 सदनिका, अगासन-ठाणे येथे 47 सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 62 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 11 येथे 40 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 8 येथे 51 सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे 68 सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे 20 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

VIDEO: नवरीला पाहताच लाजू लागला नवरदेव; दुरुनच वरमाळा फेकत ठोकली धूम

उत्पन्न किती असावं?

इच्छुक अर्जदारांचे  अर्ज सादर करतेवेळी दि. 1 एप्रिल 2020 ते दि. 31 मार्च 2021 या 12 महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25 हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,001 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,001 रुपये ते 75 हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

लॉटरीची सोडत कधी?

या लॉटरीतील घरांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत 14 ऑक्टोबर, 2021 रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे.

First published:

Tags: Mhada lottery