मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबईतील मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली आरे कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानतंर नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल दाबला का असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 28 नोव्हेंबर: मुंबईतील मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली आरे कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानतंर नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल दाबला का असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारे स्वत: नेमलेल्या मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का?

किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली. २९ नोव्हेंबरला मुंबईची नवीन लाईफलाईन मेट्रोचे काम थांबवण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले. आरे येथील कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला व मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यांनी आपला अहवाल २ आठवड्यात व नंतर मुदत वाढून ३ महिन्यात देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

मनोज सौनिक समितीची रचना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. समितीचे सदस्य तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वत: निवडले होते. समितीने १५ दिवसात व नंतर लांबून ३ महिन्यात अहवाल देण्याचे आदेश तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दिले होते. समितीने आपला अहवाल पण दिला होता. त्यानंतर या समितीचा रिपोर्ट दाबण्याचे खरे कारण काय? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला.

हेही वाचा: 'उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल'? संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

सोमय्यांनी मनोज सौनिक समितीच्या अहवालातील काही माहिती दिली. त्यात सोमय्यांनी सांगिलं की, आरे कारशेड व इतर १० जागांचा अभ्यास समितीने केला असून त्याच्या अहवालात म्हटलं की, अशा प्रकारे कोणतेही प्रकल्प थांबवणे, आरे कारशेडच्या कामाला रद्द करणे हे योग्य नाही. तसचं हे कायदेशीर आणि व्यवहार्य नाही. समिती राज्य सरकारला सूचित करू इच्छिते की, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (MMRCL) ला आरे कारशेडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावे, हे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. आरे कारशेड येथेच मेट्रो लाईन ३ चा डेपो व्हायला हवा, आरे कारशेड व मेट्रो ३ चे काम गतीने पूर्ण व्हावे” अशी सूचनाही मनोज सौनिक समितीने केली.

मनोज सौनिक समितीचा अहवाल काही महिन्यातच म्हणजे २०२० मध्येच आला होता, परंतु, ठाकरे सरकारनी स्वत:च्या जिद्द, अहंकार व "अन्य" कारणाने हा अहवाल दडपला लपविला. आरे कारशेड येथे मेट्रोचे काम पुढे होऊ दिले नाही या सगळ्या उठाठेवी मुळे आता मेट्रो ३ चा प्रकल्प रु. 10 हजार कोटीने वाढणार आहे असं सोमय्यांनी म्हटलं.

मनोज सौनिक समितीने अहवलात काय म्हटलंय?

i. आरे कारशेडची जागा २०१०/२०११ मध्ये निश्चित करण्यात आली होती, ती नोटीफाय ही करण्यात आली होती.

ii. मेट्रो ३ च्या संबंधी अंतिम निर्णय व त्याची घोषणा ही २०१३/१४ मध्ये भारत सरकार व महाराष्ट्र सरकारनी केली होती.

iii. आरे कारशेड संबंधात मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांनी मान्यता दिली होती/आहे..

iv. या कारशेडच्या कामाला कोणत्याही प्रकारची स्थगिती (Stay) नाही.

प्रकल्पाचे ५६% काम पूर्ण झाले आहे या परीस्थीतीत कारशेडचा पुनर्विचार करणे हे फक्त गैरव्यवहार्य नाही परंतु, खूपच महागडे होऊ शकते. समितीने पुन्हा एकदा आरे कारशेडच्या ऐवजी सुचवण्यात आलेल्या १० जागांची पाहणी केली यापैकी एक ही जागा मेट्रो ३ च्या कारशेडसाठी योग्य नाही असे २०२० मध्येच समितीने सुचवले असल्याचं सोमय्यांनी म्हटलं.

मुंबईची नवीन लाईफलाईन बनणारी मेट्रोच्या कामाला ठाकरे सरकारनी रुळावरून फक्त उतरवलेच एवढे नव्हे परंतु १० हजार कोटी रुपये प्रकल्पाची किंमत वाढवण्याचे महाकार्य हे ठाकरे सरकारने केले. या संदर्भात महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे सरकारनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ही किरीट सोमया यांनी केली आहे.

First published:

Tags: Kirit Somaiya, Uddhav tahckeray