पुणे 19 नोव्हेंबर : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गोवर या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. राज्यात साडेसहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात 503 रुग्ण निश्चित झाले आहेत. राज्यातील मुंबई, भिवंडी, आणि मालेगांव येथे मोठ्या प्रमाणत गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढत आहे. मुंबईकरांनो, लेकरांना सांभाळा, गोवरमुळे आतापर्यंत 4 बालकांचा मृत्यू महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बाब म्हणजे, गेल्या 2-3 वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरात आणि भारतातही थैमान घातलं होतं. आता कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच आता गोवरने डोकं वर काढलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे गोवर हा आजार कोविडपेक्षाही 4 पट वेगाने संसर्ग होणारा आजार आहे. आत्तापर्यंत गोवरचे जे रुग्ण आढळून आले आहेत यात बहुतांश जणांचं लसीकरण पूर्ण झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. डॉ.प्रदीप आवटे म्हणाले, की राज्यात सध्या गोवरचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोवर नियंत्रणात आणण्यासाठी फक्त आणि फक्त लसीकरणच गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. ज्या बालकांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांच्यासाठी विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता पालकांनी मुलांना गोवरची लस द्यावी, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, हा खतरनाक आजाराचा संकेत गोवरची लक्षणं - गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात खोकला, सर्दी, ताप, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं, घसा दुखणं, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे स्पॉट, अशक्तपणा, अंगदुखी ही लक्षणं दिसतात. गोवर प्रतिबंधात्मक उपाय - बालकांना लस वेळेवर द्या गोवर रुग्णाच्या संपर्कात जाणं टाळा संपर्कात आल्यास हात स्वच्छ धुवावेत दूषित हातांचा स्पर्श तोंड, डोळ्यांना होऊ देऊ नका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.