मुंबई, 15 नोव्हेंबर : मुंबईमध्ये कोरोनाची लाट ओसरली आहे पण आता गोवरने डोकं वर काढलं आहे. मुंबईत दिवसेंदिवस गोवरचा धोका वाढत चालला आहे. कस्तुरबा रुग्णालयात 61 बालकांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये उपचारादरम्यान एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 4 बालकांचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रूग्णालयात या बालकावर उपचार सुरू होते. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आणि इतर भागात गोवरचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. मुंबईत गोवरची लागण झालेली 740 संशयित बालकं आढळून आली आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयात विशेष वॅार्ड उभारण्यात आला आहे. ज्यात गोवर सदृश्य लक्षणे असलेल्या बालकांना भरती केलं आहे. मुंबईमध्ये गोवर रुग्णांची संख्या 126 वर पोहोचली आहे. कस्तुरबा रुग्णालयात 61 मुलांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी 6 मुलं व्हेंटिलेटर आहे. 12 विभागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, ‘हा खतरनाक आजार’) कस्तुरबा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून 8 महिने वय असलेले 8 रुग्ण दाखल झाले. 9 ते 11 महिने - 5 रुग्ण 1 ते 4 वर्ष - 31 रुग्ण, 5 ते 9 वर्ष 14 रुग्ण, 15 वर्ष आणि त्यावरील 3 रुग्ण दाखल झाले आहे. ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. गोवरची लक्षणं खोकला, सर्दी, ताप डोळ्यांची जळजळ होणं डोळे लाल होणं घसा दुखणं तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे स्पॉट अशक्तपणा अंगदुखी (या 10 सवयी बदला! किडनी खराब होऊ नये म्हणून आधीच अशी काळजी घेणं उत्तम) गोवर प्रतिबंधात्मक उपाय बालकांना लस वेळेवर द्या गोवर रुग्णाच्या संपर्कात जाणं टाळा संपर्कात आल्यास हात स्वच्छ धुवावेत दूषित हातांचा स्पर्श तोंड, डोळ्यांना होऊ देऊ नका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.