मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जेजेची एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा सानेच्या हत्येच गुढ उलगडलं, बँडस्टँडजवळ दुर्देवी शेवट

जेजेची एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा सानेच्या हत्येच गुढ उलगडलं, बँडस्टँडजवळ दुर्देवी शेवट

एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे

एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे

एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 जानेवारी : मागच्या एक वर्षांपूर्वी एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या मिठू सिंगने तिची हत्या करून तिचा मृतदेह वांद्रे बँडस्टँडजवळ फेकल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला त्याचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी याने त्याला मदत केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँच युनिट 09 च्या अधिकाऱ्यांनी काल (दि.19) गुरुवारी दोन्ही आरोपींना बँडस्टँडवर नेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी म्हणाले की आरोपींकडे मृतदेहाविषयी अधिक माहिती आहे, परंतु त्यांनी अधिक तपशील उघड केला नाही. या प्रकरणात लवकरच हत्येबाबत अधिक माहिती देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा : कपलच्या 'लपाछपी'चा भयंकर शेवट! खेळाखेळात GF चा असा डाव की BF जगातूनच 'आऊट'

जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिची हत्या करण्यात आली आहे. सदिच्छाची हत्या जीवरक्षक मिथू सिंह या युवकाने केल्याचे कबुल केले आहे. हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेकल्याचेही त्याने पोलीस चौकशीत सांगितले. पालघर येथील रहिवासी असलेली सदिच्छा ही मुंबईतील जे. जे. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

मागच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही. तिचा शोध लागत नसल्याने कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

या तरुणीचा शोध घेण्यासाठी बॅण्ड स्टॅण्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिची छायाचित्रे लावण्यात आली होती. जे. जे. मार्ग पोलिसांनीही तिचा शोध सुरू केला होता. मात्र ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

तांत्रिक पुराव्यांवरून तिचे अखेरचे ठिकाण वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड दाखवत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या वेळी तिला जीवरक्षक मिथू सिंह याने अखेर पाहिले होते.

हे ही वाचा : विम्याचे 7 कोटी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याचं कांड; रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव, पण त्या गोष्टीमुळे पोलखोल

वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मिथू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. चौकशीत सदिच्छा हिची हत्या केल्याचे मिथू याने कबूल केले. तसेच तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही सांगितले. पोलिसांनी अगोदर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पण आता या प्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

First published:

Tags: Crime, Crime news, Kidnapping, Mumbai, Palghar, Student