Home /News /maharashtra /

शासनाचे आदेश धुडकावून शाळेत सुरू होती परीक्षा, धक्कादायक प्रकार उघड

शासनाचे आदेश धुडकावून शाळेत सुरू होती परीक्षा, धक्कादायक प्रकार उघड

अनुतीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मावळ, 12 जून : कोरोना संकटाच्या काळात देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच अनेक परीक्षाही रद्द करण्यात आल्या. मात्र अशातच मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या स्नेहवर्धक विकास मंडळ बाल विकास विद्यालयामध्ये इयत्ता अकरावी कॉमर्सच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. ही बाब स्थानिक पोलिसांना माहीत झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता शाळा सुरू असल्याचा तसेच 27 विद्यार्थी पेपर लिहीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज आयटीचा पेपर 27 विद्यार्थो लिहीत होते. तर कालही शाळेने इंग्रजी विषयाचा पेपर घेतला आहे. एकीकडे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालय बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश असताना तळेगाव येथील स्नेहवर्धक बाल विकास मंडळ विद्यालय शासनाचे सर्व आदेश धुडकावून महाविद्यालय सुरू ठेवून परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी शाळेची पाहणी केली असून या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. हेही वाचा - काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र दरम्यान, महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या वगळता इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याने याबाबत अंतिम निर्णय अजून आलेला नाही. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या