महाड, 8 फेब्रुवारी : महाडमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या मल्लक स्पेशालिटी कारखान्याला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानं कारख्यान्यामध्ये छोटे-छोटे स्फोट देखील होत आहेत. आगीने रौद्ररूप धारणे केले असून, धुराचे लोट लांबपर्यंत दिसत आहेत. या घटनेनं परिसरात घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत.
दूरपर्यंत धुराचे लोट
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या मल्लक स्पेशालिटी कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कारखान्याला भीषण आग लागली असून, धुराचे लोट लांबरपर्यंत पहायला मिळत आहेत.
महाडमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या मल्लक स्पेशालिटी कारखान्याला भीषण आग लागली आहे. pic.twitter.com/y184CLmLRM
— News18Lokmat (@News18lokmat) February 8, 2023
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
कारखान्याच्या ईओ प्लांटला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. या घटनेन परिसरात गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.