मुंबई : सध्या अपघाताचा घटना समोर येत आहेत. कधी खड्ड्यांमुळे तर कधी नियंत्रण सुटून अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एक तरुण भयंकर अपघातातून वाचला आहे. मृत्यूला जवळून पाहणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काळजात धस्स करणारा आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार टर्न घेऊन पुढे जात असताना भरधाव बाईकस्वार समोरून येतो आणि दोघांची धडक होते. ही धडक एवढी जोरात बसते की दुचाकीस्वार हवेत उडून लांब पडतो. एवढा भीषण अपघात होऊनही हा तरुण त्यामधून वाचतो.
देव बलवत्त आणि काळ आला होता पण वेळ नाही तसा अगदी तसाच प्रकार या तरुणासोबत घडला. त्याने मृत्यू जवळून पाहिला. पण नशीबाने वाचला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Air time! Geeza sits right back up! pic.twitter.com/sDu3uMSX3E
— Crazy Tweets (@Crazytweets100_) August 19, 2022
Crazy Tweets नावाच्या ट्वीट युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओला ११ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची अजून माहिती मिळू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.