मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक! विवाहित महिला-पुरुषाचं एकमेकांवर जडलं प्रेम; लॉजमध्येच झाला लव्ह स्टोरीचा The End

हृदयद्रावक! विवाहित महिला-पुरुषाचं एकमेकांवर जडलं प्रेम; लॉजमध्येच झाला लव्ह स्टोरीचा The End

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Solapur: सोलापुरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रेमीयुगुलांनी हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या प्रेमाचा शेवट केला आहे.

सोलापूर, 29 सप्टेंबर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रेमीयुगुलांनी हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या प्रेमाचा शेवट केला आहे. विशेष म्हणजे मृत महिला आणि पुरुष दोघंही विवाहित असून दोघाचं एकमेकांवर प्रेम होतं. दरम्यान त्यांनी सोलापूर- पुणे महामार्गावरील एका लॉजमध्ये गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Lovers commits suicide in lodge) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

अश्विनी बिरप्पा पुजारी (वय-24) आणि धनंजय बाळू गायकवाड (वय-27) असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. मृत अश्विनी या सोलापुरातील मोदीखाना येथील रहिवासी आहेत. तर मृत धनंजय हा पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील रहिवासी आहे. दोघंही विवाहित असून दोघाचं एकमेकांवर प्रेम होतं. यातून त्यांनी सोमवारी सोलापूर-पुणे महामार्गावरील अर्जुंनसोंड फाट्यावरील हॉटेल रॉयल इन मध्ये प्रेमाचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

हेही वाचा-दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत धनंजय आणि अश्विनी यांनी सोमवारी सायंकाळी मुक्कामासाठी हॉटेल रॉयल इन मध्ये एक रुम बुक केली होती. दरम्यान रात्री पावणे अकराच्या सुमारास वेटरने ऑर्डर घेण्यासाठी रुमवर जाऊन बेल वाजवली. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही आतून कसलाच प्रतिसाद येत नसल्याचं पाहून वेटरला संशय बळावला. त्यामुळे त्याने खिडकीची काच ढकलून आतमध्ये डोकावलं.

हेही वाचा-पार्लरमध्ये घुसून विधवेवर 2तास अत्याचार; नाशकाला हादरवणाऱ्या घटनेतील नराधम गजाआड

यावेळी धनंजय आणि अश्विनी दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. धनंजय आणि अश्विनी यांनी ओढणी आणि दोरीने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Solapur