मराठी बातम्या /बातम्या /nashik /

पार्लरमध्ये घुसून विधवेवर 2 तास अत्याचार; नाशकाला हादरवून सोडणाऱ्या घटनेतील नराधम अखेर जेरबंद

पार्लरमध्ये घुसून विधवेवर 2 तास अत्याचार; नाशकाला हादरवून सोडणाऱ्या घटनेतील नराधम अखेर जेरबंद

नितीन पवार असं नराधमाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे.

नितीन पवार असं नराधमाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे.

Rape in Nashik: नाशिकमध्ये एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार (rape on beautician in nashik) केला आहे.

  • Published by:  News18 Desk

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 29 सप्टेंबर: देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका  (Saki naka Rape case) येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. यानंतर आता नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार (rape on beautician in nashik) केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, अवघ्या काही तासांत पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. तर पीडित महिला विधवा असून तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर त्याने पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर 2 तास अत्याचार केला आहे.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राचं विकृत कृत्य; विवाहितेला किचनमध्ये डांबून ठेवलं अन

या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेनं धाडस करून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नितीन पवार असं नराधमाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. अलीकडेच तो एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच त्यानं हा बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चार पथकं तयार करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

First published:

Tags: Nashik, Rape