जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

(File Photo)

(File Photo)

Murder in Palghar: डहाणूतील एका 8 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने कोयत्याने सपासप वार (minor girl attack with scythe) केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पालघर, 29 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. मुंबईनजीक डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना, पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 8 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने कोयत्याने सपासप वार (minor girl attack with scythe) केले आहेत. याप्रकरणी डहाणू पोलिसांनी संशयित आरोपीला अटक (Accused Arrested)केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आठ वर्षीय चिमुकली सोमवारी सायंकाळी दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीने तिच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की, 8 वर्षीय चिमुकली जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.  (8 years old minor girl murder) हेही वाचा- अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्… बराच वेळ झालं तरी मुलगी दुकानातून परत कशी आली नाही, हे पाहण्यासाठी तिचे नातेवाईक तिला शोधण्यासाठी दुकानाच्या दिशेने गेले. दरम्यान रस्त्यात एकेठिकाणी चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात आढळली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं आहे. हेही वाचा- अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्… वर्षा घोषे असं हत्या झालेल्या 8 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. तर पहाटे घरी आलेल्या प्रमोद घोषे या 35 वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीने संबंधित विकृत घटना नेमक्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात