भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली, महिला तहसिलदाराचा केला आक्षेपार्ह उल्लेख

भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली, महिला तहसिलदाराचा केला आक्षेपार्ह उल्लेख

या मोर्चाला कोण बोलवायचं ते सांगा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, चंद्रकांतदादा पाटील असो, की सुधीर मुनगंटीवार कुणाला मोर्चासाठी आणायचं ते तुम्ही फक्त सांगा.

  • Share this:

विजय कमळे पाटील, जालना 02 फेब्रुवारी : भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवढा मंत्री बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. लोणीकर यांनी स्थानिक तहसिलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. जालना जिल्ह्यातल्या परतूर कऱ्हा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. या आधीही लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या काळात लोणीकर यांनी पैसे वाटल्याचं वक्तव्य केलं होतं. तसच राहुल गांधी यांच्यावरही पातळी सोडून टीका केली होती. त्यामुळेही वाद निर्माण झाले होते.

परतूर कऱ्हा इथं एका विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारविरुद्ध मोठा मोर्चा काढू अशी घोषणा केली. असा मोर्चा निघाला तर त्याचा सरकारला हादरा बसेल असंही ते म्हणाले. हा मोर्चा हा भव्य असावा. 25 हजार शेतकरी त्या मोर्चाला आले पाहिजे असं लोणीकर यांनी सांगितलं.

मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत 'बार' मालकाला मारहाण

या मोर्चाला कोण बोलवायचं ते सांगा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, चंद्रकांतदादा पाटील असो,  की सुधीर मुनगंटीवार कुणाला मोर्चासाठी आणायचं ते तुम्ही फक्त सांगा असं लोणीकर म्हणाले. नंतर त्यांची जीभ घसरली. या मोर्चासाठी कुठली हिरोईन आणायची ते का सांगा? असा सवाल त्यांनी लोकांना केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. कुणी हिरोईन मिळाली नाही तर तहसिलदारालाच घेऊन येतो. त्याच हिरोईनसारख्या दिसतात असंही त्यांनी सांगितलं.

फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी ज्वारीचा मॉल, मराठमोळ्या दाम्पत्याची भन्नाट आयडिया

लोणीकरांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केलाय. यातून भाजपच्या नेत्यांची मानसिकता दिसून येते अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2020 10:59 AM IST

ताज्या बातम्या