बीड, 02 ऑगस्ट : नापिकी आणि कर्ज बाजरीपणामुळे वडिलांनी आत्महत्या केली. आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना तिला कामात मदत करून राहुल शिंदे याने दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. मोठ्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळवले आहेत. परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेलं यश खरच कौतुकास्पद आहे. अंबेजोगाई तालुक्यातील मंगईवाडी या छोट्या गावातील धडपडणाऱ्या मुलांची ही यशोगाथा आहे.
लोकवस्तीच्या मंगईवाडी गावातील राहुल रामदास शिंदे यांचे कुडाचे घर आहे. दोन वर्षापूर्वी वडील रामदास शिंदे यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने शिंदे कुटुंब पोरकं झालं होतं. आई संजीवनी यांनी मोलमजुरी करून मोठ्या जिद्दीने आपले कुटुंब चालवले.
काळजाला स्पर्श करणारी घटना; राखी आणली, लाडू केले पण...
दोन मुलं व दोन मुली यांना सोबत घेऊन त्यांची शिक्षणही सुरू ठेवली. आई उसतोडीला गेल्यानंतर ही मुलं एकटीच घरी असायची. त्यांनी स्वतःची कामं स्वत: करीत शाळा कधी चुकवली नाही. मोठ्या मुलीचे लग्न झाल्यामुळे राहुल व त्याची दुसरी बहीण जयश्री यांनी आपल्या वडिलांचे दु:ख विसरून शिक्षणाची कास सोडली नाही. घरापासून तीन किलोमिटर अंतरावर येल्डा इथे क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय आहे. या शाळेत तो इयत्ता पाचवीपासून दहावी पर्यंत चालतच शिक्षण केले घरची सगळी कामे आटपून तो शाळा करायचा.
पत्नीसह घरात आलेल्या पाहुण्याचीही केली निर्घृण हत्या, कोयत्याने केले सपासप वार
सुट्टीच्या दिवशी आईसोबत त्याला मजुरीलाही जावे लागायचे, निकाल लागल्यावर आनंद वाटला मला वैद्यकीय क्षेत्रात करीअर घडवून आईचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मनोदय राहुल ने बोलून दाखवला मोठं होऊन आईला कष्ट मुक्त करायचं असं राहुल म्हणतो.
'तू खूप मोठा झालास?' 3 मित्रांमध्ये झाली वादाला सुरुवात, काही क्षणात एकाची हत्या
लोकांच्या शेतात मोल मजुरी करून मी मुलं शिकवली त्यानी पण चांगला अभ्यास केला. यात समाधान वाटत आज आनंद वाटतोय. माझ्या मुलाने नाव कमावलं म्हणत डोळ्यांतील आनंद अश्रूला वाट मोकळी करून दिली. कठीण श्रम घेऊन राहुलने परिस्थितीवर मात मिळवत 10 वीच्या परीक्षेत मिळवलेले यश प्रेरणादाई आहे.