पाथरी हेच साईंचं जन्मस्थान, सिद्ध झालं नाही तर राजीनामा देण्याची शिवसेना खासदाराची प्रतिज्ञा

पाथरी हेच साईंचं जन्मस्थान, सिद्ध झालं नाही तर राजीनामा देण्याची शिवसेना खासदाराची प्रतिज्ञा

पाथरी हेच साई बाबा यांचे जन्म स्थळ आहे आणि त्यांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे 29 पुरावे पाथरीकारांकडे असल्याचा दावा केला जातोय.

  • Share this:

औरंगाबाद 21 जानेवारी : श्रद्धा सबुरी असा महान मंत्र देणारे साईबाबा आता कर्म आणि जन्म भूमीच्या वादाच्या कचाट्यात सापडले आहेत. साई बाबांच्या शिर्डीत आणि पाथरी मध्ये श्रद्धा सगळ्यांमध्ये दिसतेय मात्र सबुरी दोघांमध्येही मध्ये दिसत नाही. आता तर परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी तर प्रतिज्ञाच केलीय. पाथरी हे साई बाबांचे जन्म स्थळ सिद्ध झाले नाही तर राजीनामा देईन असं जाधव म्हणालेत. त्यामुळे पाथरीकर साईबाबा यांच्या जन्म स्थळावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे तर शिर्डीकर सुद्धा जिद्दीला पेटलेत त्यांच्या नुसार साई बाबा यांचे जन्म स्थळ म्हणून पाथरीचा विकास करू नये अशी गळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. या सगळ्या वादात 'सामना' ने भर घातलीय. सामनाच्या आजच्या लेखात साई बाबा अवतरले त्या मुळे त्यांच्या जन्माचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका सामनाच्या लेखात मांडली आहे.

पाथरी हेच साई बाबा यांचे जन्म स्थळ आहे आणि त्यांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे 29 पुरावे पाथरीकारांकडे असल्याचा दावा आहे. आज पाथरी मध्ये ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेत एकमुखी मागणी झाली साई बाबा यांचं जन्म स्थळ पाथरीच आहे आणि जन्म स्थळाची मान्यता मिळवण्यासाठी रीतसर प्रयत्न करण्याचा ठराव ही झाला.

तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा

शेवटी ग्रामसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साई बाबांच्या जन्माचे पुरावे देणे. आणि साई बाबांच्या जन्म स्थळ शोधून काढण्यासाठी सत्य शोधन समिती स्थापन करावी अशीही मागणी करण्यात येणार आहे. साई बाबांच्या बद्दल श्रद्धा शिर्डी पाथरी दोघेही दाखवतात मात्र त्याच साईंच्या जन्म स्थळा बाबत कुणीही सबुरीने घ्यायला तयार नाही त्यामुळे भविष्यात हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हा वाद सुरू असतानाच त्यात आता बीडनेही उडी घेतलीय.

साईबाबा हे बीडमध्ये नोकरीला होते असा दावा काही जणांनी केलाय. त्यामुळे बीडच्या विकासासाठीही 100 कोटींचा निधी द्यावी अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यामुळे या वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते.

राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर

याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. राष्ट्रीय कीर्तनकार भरत बुवा रामदासी यांनी मौखिक पुरावे असल्याचे दाखले दिले आहेत. तर साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे.

मौखिक परंपरेनुसार जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. असे साई भक्त आणि राष्ट्रीय किर्तनकार भरत बुवा रामदासी म्हणाले. साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं झाला असं म्हटलं जातं.

First published: January 21, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या