कोरोनाबाधित महिलेचा घरातच झाला मृत्यू, तब्बल 6 तास पडून होता मृतदेह

कोरोनाबाधित महिलेचा घरातच झाला मृत्यू, तब्बल 6 तास पडून होता मृतदेह

वृद्ध महिलेचा मृतदेह घरात तब्बल 6 तास पडून होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 30 जुलै : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या साई गॅलेक्सी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेचा कोरोनामुळे घरात मृत्यू झाला. मात्र त्यानंतर मृतदेह पुढील कारवाईसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्नालयात पाठविण्याकरीता कँन्टोन्मेंट बोर्डाकडून रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने वृद्ध महिलेचा मृतदेह घरात तब्बल 6 तास पडून होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

या सर्व प्रकरणात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनीही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाला दिली. सदर महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मयत महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळावर दाखल होत मयत महिलेच्या इतर नातेवाईकांना घरातच क्वारन्टाइन राहण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसंच मृतदेह प्लास्टिकमधे सील बंद करण्यासाठी बाजारातून प्लास्टिक बॅग आणून महिलेचा मृतदेह प्लास्टिकमध्ये सील बंद करण्यास नातेवाईकांना सांगितले.

कर्मचांऱ्यानी सांगितल्याप्रमाणे वृद्ध महिलेच्या मृतदेहाला प्लास्टिकमध्ये बंद केल्यानंतर बोर्डाकडून रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी नातेवाइकांकडून वांरवांर मागणी करण्यात आली. पंरतु रुग्णवाहिका तात्काक उपलब्ध होणार नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृतदेह तब्बल 6 तास घरातच पडून राहिल्याची माहिती मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपचारकामी रुग्णवाहिका , आरोग्य कर्मचारी,तसेच डॉक्टरांची कमतरता जाणवू लागली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयातून सेवा देत आसताना रुग्णवाहिका तसेच स्टाफ इतर ठिकाणी पाठवला असल्याने घटनास्थळावर जाण्यास विलंब झाला असल्याची माहिती डॉक्टर सुनिता जोशी यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2020, 11:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading