मराठी बातम्या /बातम्या /देश /शे किंवा हजार नाही; तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाखांचं बिल

शे किंवा हजार नाही; तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाखांचं बिल

इतकचं नाही या छोट्याशा गावातील शेतकऱ्याला बिल भरण्यासाठी नोटीसही आली

इतकचं नाही या छोट्याशा गावातील शेतकऱ्याला बिल भरण्यासाठी नोटीसही आली

इतकचं नाही या छोट्याशा गावातील शेतकऱ्याला बिल भरण्यासाठी नोटीसही आली

बलरामपूर, 31 जुलै : बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाच्या एका शेतकऱ्याला तब्बल 64 लाख रुपयांचं बिल आलं आहे. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली आहे. नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी शिवकुमार आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे.

शेतकऱ्याच्या घरातील सर्वचजण चिंतेत आहे. 2018 मध्ये या गावाचे विद्युतीकरण केले होते. गावातील शेतकरी शिवकुमारने पत्नी सुनीता देवीच्या नावावर विजेचं कनेक्शन घेतलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये शिवकुमारची पत्नी सुनीता देवीच्या नावावर 1700 रुपयांचा विजेचं बिल आलं होतं.

हे वाचा-राम जन्मभूमीतल्या पुजाऱ्याला कोरोना, 16 सुरक्षा रक्षकांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

हे विजेचं बिल शिवकुमार काही कारणास्तव जमा करू शकले नाही. 29 जुलै 2020 मध्ये शिवकुमारची पत्नी सुनीता देवीच्या नावावर 64,02,507 रकमेची नोटीस आली. आणि ही रक्कम 8 ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत आहे. आपल्या सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातही त्यातही मुंबई आणि जवळील शहरांमध्ये अनेकांना विजेची मोठी बिलं आली आहे. हा आकडा पाहून सर्वांचेच डोळे फिरले आहेत. सिनेसृष्टीतील अनेकांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ज्यादा बिलाबाबत शंका व्यक्त केली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india