मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! कंडक्टरने एसटीमध्येच संपवला जीव, 'या' भीतीमुळे केली आत्महत्या

धक्कादायक! कंडक्टरने एसटीमध्येच संपवला जीव, 'या' भीतीमुळे केली आत्महत्या

Suicide news: आज पहाटे चारच्या सुमारास संबंधित एसटी वाहकाने (ST Conductor) आगारात उभ्या असलेल्या गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 26 फेब्रुवारी: एका एसटी वाहकाने एसटीमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत कारवाईच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आली. आज पहाटे चारच्या सुमारास संबंधित एसटी वाहकाने (ST Conductor) आगारात उभ्या असलेल्या गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय मृत एसटी चालकाचं नाव संजय संभाजी जानकर (Sanjay Sambhaji Jankar) असून त्यांनी माहूर एसटी आगारात वाहक म्हणून नोकरी करतात. त्यांनी आगारात उभ्या असलेल्या एका एसटीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्यानी आज शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमाराच आगारात उभ्या असलेल्या  एमएच- 20 बीएल-4015 या नंबरच्या एसटीमध्ये गळफास घेवून त्यांचे जीवन संपवले आहे.

(हे वाचा-या राज्यात दिसला Bharat Bandhचा सर्वात जास्त प्रभाव! पुणेकरांचाही बंदला प्रतिसाद)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी हे कंडक्टर माहूर-नांदेड या मार्गावर फेरीवर होते. यावेळी त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून प्रवासाचे पूर्ण पैसे घेतले. मात्र धनोड्यापर्यंतचंच तिकीट त्यांना दिलं असल्याचं  तपासणी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू होती.

हे ही वाचा - नागपूर हादरलं, 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून बलात्कार, नराधम अटकेत

कोणतीही कारवाई होण्याअगोदरच संबंधित एसटी वाहकाने भीतीपोटी आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शिवाय मृत जानकर यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची माहितीही आगारप्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी दिली आहे.

First published:

Tags: Bus conductor, Crime news, Maharashtra, Marathwada, Nanded, Shocking news, Suicide