बीड, 03 ऑगस्ट : बहीण भावाच्या नात्यामधील गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणावर या वर्षी कोरोनाचं सावट आहे. एसटी बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतूकी बंद असल्यामुळे लाडक्या भाऊरायाला ओवाळनी करून राखी बांधणं यावर्षी चुकत की काय अशी चिंता हजारो खेड्या-पाड्यातील बहिणींना आहे. त्यातच लॉकडाऊन आणि वाढती रुग्ण संख्या यामुळं बहीण-भावाच्या या प्रेमाच्या क्षणाला मुकावं लागणार आहे.
अनेक वर्षापासून न चुकता रक्षाबंधन करणाऱ्या बहिणीने लाडक्या लहान भावासाठी आवडणारे डाळीचे लाडू तयार केले. राख्यादेखील बांधून ठेवल्यात मात्र, लातूरला भावाकडं जायचं कसं? असा प्रश्न आज बीड जिल्ह्यातील सात्रा पोथरा गावातील मीराबाई हावळे यांना पडला आहे. 25 वर्षापूर्वी लग्न झालेल्या मीराबाईंनी एकही रक्षाबंधन चुकवलं नाही. एखाद्यावेळी दिवाळीला शेतातील कामामुळे आम्ही जात नाही पण रक्षाबंधन मात्र चुकणार नाही. पाच बहिणीच्या पाठीवर नवसाने जन्मलेल्या लाडक्या 2 भावांना ओवाळन्यासाठी पाचजणी एकत्र येतोत. दोन दिवस राहतात मात्र यावर्षी हे कठीण दिसतं म्हणताना, मीराबाईंचे डोळे पाण्याने ओले झाले.
Weather Alert: मुंबईत ऑरेंज तर या भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट
प्रत्येक वर्षी 2 दिवस अगोदर निघानाऱ्या मीराबाईंनी भावासाठी आवडणारे लाडू तयार करून ठेवले. राख्या विकत घेतल्या मात्र लातूरला जाणारी बस बंद आहे. गाडीवर जाताना जिल्हा बंदी आहे. त्यामुळे जायचं कसं असा प्रश्न आहे. असाच प्रश्न हजारो बहिणींसमोर आहे. या वर्षी कोरोनाचं संकट बहीण भावच्या सणावरदेखील परिणाम करत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन
एसटी बस, रेल्वे किंवा पोस्टाने राखी पाठवायची तर आज माजलगाव शहरातील या पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठवण्यासाठी येणाऱ्यांची संख्य खूप कमी काही कार्यलयात तर कोणी फिरकलेच नाही असं पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी जितेंद्र सावंत यांनी सांगितलं.
पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं, अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा
माजलगाव शहरातील पूनम राखी दुकानं विक्रेत्याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहकदेखील कमी झाला. मागच्या वर्षी दररोज 50 डझन राखी विकणाऱ्या विष्णू पवार यांच्या दुकानात यावर्षी रोज एक डझनदेखील विक्री होत नाही. कोरोनामुळे मार्केट सगळं कोलमडलं आहे असं राखी विक्रेत्यानं सांगितलं. या कोरोनाच्या संकटात रक्षाबंधनाचा सण या वर्षी अनेक बहिणींना भावाच्या भेटीविणाच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे घरीच राहून भावच्या सुरक्षेची प्रार्थना करावी लागणार आहे.