जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / BREAKING: पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं, अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा

BREAKING: पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं, अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा

BREAKING: पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं, अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा

डॉन न्यूजची (Dawn News) वृत्तवाहिनी रविवारी दुपारी हॅक झाली. या वृत्त वाहिनीची संपूर्ण सिस्टम हॅक करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 03 ऑगस्ट : पाकिस्तानचा (Pakistan) प्रसिद्ध आणि आघाडीचा मीडिया हाऊस असलेल्या डॉन न्यूजची (Dawn News) वृत्तवाहिनी रविवारी दुपारी हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे. या वृत्त वाहिनीची संपूर्ण सिस्टम हॅक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे वृत्तवाहिनी सुरू होती, त्यानंतर अचानक प्रसारण थांबलं आणि तिरंगा (Indian Flag) झळाऴू लागला. या तिरंग्यासह स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा (Happy Independence Day) मेसेज होता अशी माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहेत. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टम हॅक करण्यामागे हॅकर्सचा हात असू शकतो. यासंबंधी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डॉनने एका निवेदनातून जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जाहिरात सुरू होती. त्याचवेळी अचानक जाहिरात थांबली आणि भारताचा झेंडा फडकू लागला. ज्यावर स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज लिहिला होता.

जाहिरात

यापूर्वीही भारतीय हॅकर्सकडून अशा प्रकारे सिस्टम हॅक झाल्याची घटना घडली असल्याचा आरोप डॉन न्यूज चॅनलकडून करण्यात आला आहे. भारतीय हॅकर्स चॅनेलच्या यंत्रणेवर हल्ला करत आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा चॅनलमधील इतर लोकांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. काही मिनिटांत चॅनल पुन्हा सुरू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, चॅनलवर हा व्हिडिओ नेमका किती वेळ सुरू होता याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर या प्रकरणात आम्ही तात्काळ तपास करत असून हे कोणी केलं याची माहिती लवकरच समोर येईल असं डॉन याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात