जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

अनघा यांचा 14 मे 1964 रोजी मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑगस्ट : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळ्ने निधन झालं आहे. त्यांचं वय 75 होतं. मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनघा यांचा 14 मे 1964 रोजी मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं, अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा आतापर्यंत संपूर्ण वाटचालीमध्ये मनोहर जोशी यांच्या पाठीमागे त्या खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनी मनोहर यांना राजकीय व सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली. मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तेव्हा कायम त्यांच्या मागे उभ्या असायच्या. 1968 मध्ये दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द उमलत गेली. या सगळ्या प्रवासात साथ देणाऱ्या अनघा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात