जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उदयनराजेंनी 'या' 2 अटींवरच घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय!

उदयनराजेंनी 'या' 2 अटींवरच घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय!

उदयनराजेंनी 'या' 2 अटींवरच घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय!

अटी मान्य करण्यात आल्याने उदयनराजेंनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

संदीप राजगोळकर, सातारा, 13 सप्टेंबर : खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगत होती. मात्र याबाबत उदयनराजेंनी स्वत: भाष्य करणं टाळलं होतं. कारण त्यांनी भाजपसमोर ठेवलेल्या अटींना दिल्लीतील नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता. मात्र आता त्या अटी मान्य करण्यात आल्याने उदयनराजेंनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे. उदयनराजे यांचा याआधीच झालेल्या भाजपच्या मेगाभरतीत पक्षप्रवेश होणार होता. मात्र मी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी, असा उदयनराजेंचा आग्रह होता. मात्र विधानसभा अगदीच तोंडावर आली असल्याने तेव्हाच पोटनिवडणूक घेणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचं भाजपचं म्हणणं होतं. त्यामुळे भाजपकडून ही मागणी मान्य करण्यात येत नव्हती. दुसरीकडे, लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास आपल्याला राज्यसभेवर घ्यावं, अशी अटही उदयनराजेंनी घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मोठ्या खलबतानंतर उदयनराजेंच्या या अटी मान्य झाल्या. त्यानंतरच उदयनराजेंनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जातं. भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंसमोर निर्माण होऊ शकतात ‘ही’ आव्हानं राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. ‘या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,’ असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप प्रवेश नक्की करण्यासाठी उदयनराजे यांनी पुरेसा वेळ घेतला. VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात