धुळे, 23 जुलै : राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असलं तरी हत्या आणि आत्महत्येच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आत्महत्येची अशीच एक घटना धुळ्यातून समोर आली आहे. आई आणि दोन चिमुकल्या मुलींना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साक्री गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आईने आधी मुलींना गळफास देत नंतर स्वतः आत्महत्या केली. यामध्ये तिघींचाही जागीच मृत्यू झाला. साक्री शहरातील आदर्श नगर मधील ही घटना आहे. अनिता शिंदे(आई), रिया शिंदे (5) आणि भाग्यश्री शिंदे (3) या अशी तिघींची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता यांचा नवरा आणि वडील सुतारकाम करतात. त्यांना दोन मुली आहेत. अनिता यांनी दोन हसत्या-खेळत्या मुलींचा जीव घेऊन स्वत: आत्महत्या का केली? त्यांनी आयुष्य संपण्याचं टोकाचं पाऊल का उचललं? याचा सध्या साक्री पोलीस तपास करत आहे. शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट आली अंगाशी, पोलिसांनी केली कारवाई पोलिसांनी घटनास्थळावरून तिघींचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर हत्या आणि आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलीस अनिता यांच्या कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण एकाच क्षणात घरातील तिघींनी अशा प्रकारे आपलं जीवन संपवल्याने परिसरात दुखाचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.