बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ मुक्तीची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

  • Share this:

बीड, 26 ऑगस्ट- पुढील पाच वर्षांत बीड जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी बोलत होते. राज्याच्या ग्रामविकास मंत्री व बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी मराठवाडात दाखल झालेल्या महाजनादेश यात्राचे आष्टी तालुक्यांतील धामणगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

कडा येथे आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'या पाच वर्षांत आम्ही रस्ते, ग्रामीण पायभूत सुविधा दिल्या. पुढील पाच वर्षांत कायम स्वरूपीचा दुष्काळ नाहीसा करू. यासाठी कोकणातून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वॉटर ग्रिडच्या माध्यमातून वळवू. यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद द्या.' या सभेचे नियोजन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले होते.

मराठवाड्यात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्यासोबत पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे व जिल्हातील सर्व भाजप आमदार पुढील दोन दिवस सोबत असणार आहे. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ मुक्तीची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

पावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग!

पावसाने दोन महिन्यातच पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळामुळे हतबल झाल्याने एका शेतकऱ्याने तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडले आहे. पाऊस पाडावा म्हणून मारुती समोरच धरणे धरले आहे. 'देवा आत्ता तूच सोडवं, या दुष्काळाच्या संकटातून,' असे म्हणत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतील शेपवाडी येथील शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी अन्नत्याग केला आहे.

उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे गावकरी चिंतातूर आहेत. अंबाजोगाई तालुक्यावर गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे भीषण सावट आहे. यावर्षी तर दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. खरीप पेरणी वाया गेली. रब्बीचा तर पेराच झाला नाही. यावर्षीही पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. यार्षीही पुन्हा पेरणी नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

गावात पिण्याचे पाणी नाही, रेशन नाही, शेतात गुरांना चारा नाही, पाणी नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती नसतानाही त्यांना पाच हजार रुपये टनदराने चारा खरेदी करावा लागतोय. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागलाय. या स्थितीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गुरांचे व माणसांचे बेहाल सहन होत नसल्याने बजरंगबलीचे निसिम्म भक्त ऊत्तमरावांनी श्रद्धेपोटी अन्नत्याग करून हनुमान मंदिरात ठाण मांडून बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी ही ते मंदिरात बसून आहेत. ग्रामस्थांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पाऊस आल्याशिवाय मंदिरातून जाणार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या