देशात जनता कर्फ्यू सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप, मुलीचं धुमधडाक्यात लावलं लग्न

देशात जनता कर्फ्यू सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप, मुलीचं धुमधडाक्यात लावलं लग्न

मंगलकार्यालय भाड्याने देणं हा मालकाचा गुन्हा असला तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला ही गोष्ट का लक्षात आली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय.

  • Share this:

औरंगाबाद 23 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सर्व देशात लोकांनी घरात बसून कडकडीत कर्फ्यू पाळला. त्यासाठी पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. मात्र औरंगाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप उघडकीस आलाय. देशात जनता कर्फ्यू पाळला जात असतानाच या अधिकाऱ्याने आपल्या मुलीचं धुम धडाक्यात लग्न लावल्याचं उघड झालंय. या प्रकरणी संबंधित मंगलकार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढला होता. असं असतानाही या लग्नासाठी मंगल कार्यालय दिले गेले. त्यामुळे सावंगी येथील आईसाहेब मंगलकार्यालय मालकावर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला त्यांनी हे कार्यालय दिले होते.

लग्नाला 500 ते 800 लोक उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मंगलकार्यालय भाड्याने देणं हा मालकाचा गुन्हा असला तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला ही गोष्ट का लक्षात आली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय.

चंद्रपुरातील क्वारंटाइनच्या हातावर जीपीएस बेल्ट, जिल्हा प्रशासनाचा जालीम उपाय

भिवंडीतही गुन्हा- करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही भिवंडी शहरातील मशिदीत दुपारी नमाज पठाणासाठी गर्दी जमली होती. त्यामुळे मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भिवंडी शहरातील आसबीबी मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वच धर्माच्या धार्मिक स्थळांना बंद करण्यात आलं आहे.

आसबीबी मशिदीचे अध्यक्ष गुलाम अहमद खान, खजिनदार मरगुब हसन अन्सारी, सदस्य मोहम्मद हबीब अन्सारी, हजरत अली अन्सारी व इतर विश्वस्त यांच्या विरोधात फौजदारी दंड प्रक्रिया 144 (1) (3)  प्रमाणे भादवी कलम 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती उल्लंघन कायदा 2005 चे कलम 51 ब प्रमाणे मनाई आदेशाचा भंगकेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातून आनंदाची बातमी, कोरोनाग्रस्त दाम्पत्याची उपचारानंतर पहिली टेस्ट निगेटिव

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती दिली आहे की सध्या जमावबंदी आदेश लागू असल्याने सर्व मंदिरं, मशिदीमध्ये गर्दी जमवू नये असे समक्ष बोलावून सांगितले असून मस्जिद मधून फक्त नमाज पठणाची वेळ झाली याची माहिती दिली जावी. यासाठी फक्त अजान देण्याचे सांगण्यात आले असून नागरीकांनी घरामध्येच नमाज पठण करावं अशी विनंती करण्यात आली होती.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2020 10:40 PM IST

ताज्या बातम्या