Home /News /maharashtra /

CoronaVirusLockdown: नियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल

CoronaVirusLockdown: नियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल

मुख्य भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यावर बंदी करण्यात आली. ठराविक वेळेत व ठराविक जागीच भाजी विकता येणार आहे.

    कन्हैया खंडेलवाल, (प्रतिनिधी)  हिंगोली, 26 मार्च: कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचं संक्रमण वाढलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाजी विकेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हेही वाचा...संजय राऊतांचा 'तो' व्हिडीओ पाहून काय म्हणाले नितेश राणे, केली खोचक टीका मुख्य भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यावर बंदी करण्यात आली. ठराविक वेळेत व ठराविक जागीच भाजी विकता येणार आहे. मात्र तरीही आज मुख्य भाजी मंडई मध्ये काही भाजीविक्रेते भाजी विकत असल्याची माहिती हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी रामदास पाटील यांना मिळाली. रामदास पाटील यांनी तात्काळ पथक पाठवत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा भाजीविक्रेत्या विरोधात कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 56 अन्वये दहा भाजीविक्रेत्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...चंद्रपूरच्या मशिदीत सापडले 11 तुर्कस्तानी मौलवी, गेल्या 22 दिवसांपासून होते लपून मोहम्मद आवेस मोहम्मद रफीक, शेख अतीक शेख नजीर, मोहम्मद सलीम फरीद, शेख अनिस शेख बशीर, शेख उस्मान शेख रुख्मान, त्र्यंबक दत्तराव भोसले, लक्ष्मीबाई सुकलाल बाशिरे, शेख मोबीन शेख रहमान, शेख आयुब शेख गणी, सचिन मारोतराव हाके या दहा विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली नगर परिषदने केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे आतातरी भाजीविक्रेते वठणीवर येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या