Home /News /maharashtra /

धक्कादायक: SRPFचे 2 जवानच ड्युटी सोडून पळून आल्याचं उघड, दोघही निघाले पॉझिटिव्ह

धक्कादायक: SRPFचे 2 जवानच ड्युटी सोडून पळून आल्याचं उघड, दोघही निघाले पॉझिटिव्ह

देशात सुरुवातीच्या महिन्यांमध्ये फक्त 1 प्रयोगशाळा होती सध्या देशात 1,301 कोरोनाच्या टेस्ट लॅब आहेत.

देशात सुरुवातीच्या महिन्यांमध्ये फक्त 1 प्रयोगशाळा होती सध्या देशात 1,301 कोरोनाच्या टेस्ट लॅब आहेत.

बंदोबस्तावर असलेले 2 जवान हे मालेगाव येथे ड्युटीवरून कोणालाही न सांगता पळून परस्पर जालन्यात परतल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली.

जालना 06 मे: जालन्यात सहा दिवसांपूर्वी पोझिटिव्ह आढळून आलेले राज्य राखीव दलाचे ते दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस जवान हे अतिशय धाडसीपणे कोरोनाविरुद्ध आघाडीवर लढत आहेत मात्र या जवानांच्या या कृत्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच सहा दिवसांपूर्वी अचानक जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पाचपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 मधील जवान होते.  ते जवान मालेगाव येथे बंदोबस्तावरुन परतलेले होते. त्यापैकी 2 जवान हे मालेगाव येथे बंदोबस्त ड्युटीवरून कोणालाही न सांगता पळून परस्पर जालन्यात परतल्याचं उघड झालं. याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे. या जवानांची कृती ही अतिशय धक्कादायक समजली जाते. अरेच्चा! फक्त कोळी दिसला आणि संपूर्ण कुटुंब घरच सोडून गेलं राज्य आणि मुंबईमधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतली रुग्ण संख्या वाढत असल्याने आता डॉक्टर्स कमी पडत आहेत. क्रिटिकल पेशंट्ससाठी बेडही कमी पडत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत संरक्षण विभागाकडे काही ICU बेड आहेत, डॉक्टर्स आहेत ते त्यांनी दिले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र तो पर्याय हा शेवटचा ठेवा असं लष्कराच्या डॉक्टर्सनी सांगितलं असंही ते म्हणाले. राज्यात आज 1233 नवीन रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 16758 एवढी झाली आहे. तर आज 34 मृत्यू झालेत. तर मुंबई महापालिका हद्दीत दहा हजार टप्पा पार पडला. मुंबईत एकुण रुग्णसंख्या तब्बल 10714 एवढी झालीय. तर आतापर्यंत 412 जणांचा मृत्यू झाला. आज 275 जणांना डिस्चार्ज मिळाला. गर्लफ्रेंड्स आणि कुटुंबाचा नादच करतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा आज मृत्यू झालेल्यां 34जणांमध्ये सर्वाधिक 25 जण मुंबईचे, तर पुणे 3, अकोला 3, जळगांव सोलापूर प्रत्येकी 1 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 24 तासात 769 रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे मुंबई हे सर्वात मोठं आव्हान आहे. धारावी मध्ये कोरोनाचे 68 नवे रुग्ण आढळून आले आहेत.आजचे मिळून धारावीत एकूण रुग्ण संख्या 733 वर पोहोचली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या