Home /News /news /

अरेच्चा! फक्त कोळी दिसला आणि संपूर्ण कुटुंब घरच सोडून गेलं

अरेच्चा! फक्त कोळी दिसला आणि संपूर्ण कुटुंब घरच सोडून गेलं

या कुटुंबाला केळ्यांच्या घडात विषारी असे कोळी आणि त्यांची अंडी दिसली.

    कॉर्नवॉल, 06 मे : एखाद्या वस्तूवर तुम्हाला कोळी (sider) दिसला तर तुम्ही काय कराल? फार फार तर त्या कोळीला दूर कराल आणि ती वस्तू स्वच्छ करून घ्याल. मात्र एका कुटुंबानं कोळी दिसताच चक्क आपलं घरच सोडलं आहे. केळ्यांच्या घडात घातक असे कोळी पाहिल्यानंतर हे कुटुंब आपलं घर सोडून गेलं. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, मिलेनी प्राइस यांना केळ्यांच्या घडात 20 कोळी आणि त्यांची अंडी दिसली. त्यानंतर त्या आपला पती आणि 2 मुलांसह घराबाहेरच निघून गेल्या. कारण त्यांना दिसलेले हे कोळी जीवघेणे असू शकतात अशी माहिती त्यांना मिळाली. हे कोळी सामान्य नाही तर ब्राझीलमध्ये सापडणारे सर्वाधिक असे विषारी कोळी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.दक्षिण अमेरिकेतील क्रिटर्सचं विष जगात सर्वात घातक आहे. हे वाचा - अमेरिकेत नव्या संकटाने उडाली खळबळ, पहिल्यांदाच सापडली अत्यंत जहाल जीवघेणी माशी   मिलेनी यांनी सांगितलं की, हा कोळी माणसाचा फक्त 2 तासांत जीव घेऊ शकतो. खरंच हा विचार करूनच तो किती भयानक असेल याची कल्पना येते. आम्हाला स्वत:ला आणि मुलांना सुरक्षित करायचं होतं. सुपरमार्केट प्रमुखांनी कुटुंबाला सांगितलं की, त्यांना त्यांच्या घरात कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक ते उपाय करायला हवेत.मिलेनी यांच्या घरात आता कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आहे, त्यामुळे 2 आठवड्यांपर्यंत घर बंद करण्यात आलं आहे. हे वाचा - ब्रिटनमध्ये दाढी असलेल्या डॉक्टरांना का करू दिली जात नाहीये रुग्णसेवा? दरम्यान याबाबत टेस्कोतील एका प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही पॅकिंगपूर्वी सर्व केळी धुवून घेतो आणि त्यांची तपासणीही करतो. अशा किटकांची माहिती लगेच झाल्यास त्यांच्यापासून बचाव करता येऊ शकतो. ब्राझीलियन कोळी इतर कोळ्यांच्या तुलनेत विषारी आणि घातक असू शकतात. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या