Home /News /national /

गर्लफ्रेंड्स आणि कुटुंबाचा नादच करतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा

गर्लफ्रेंड्स आणि कुटुंबाचा नादच करतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुटुंबाची ओढ आणि गर्लफ्रेंड्सच्या नादात हे दहशतवादी सुरक्षा दलांचे टार्गेट होत आहेत.

    नवी दिल्ली 06 मे: काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना एक मोठं यश मिळालं आहे. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे दहशतवादी कुटुंबाची ओढ आणि गर्लफ्रेंड्सच्या नादात हे दहशतवादी सुरक्षा दलांचे टार्गेट होत आहेत. रियाझ नायकू रियाझ हा आपल्या मूळ गावी कुटुंब आणि गावकऱ्यांना भेटण्यासाठी आला होता. हीच वेळ साधत सुरक्षा दलांनी त्याला टिपलं. दहशतवादी संघटनेत गेल्यानंतरही त्याला आपलं कुटुंब आणि गावकऱ्यांची ओढ लागत असे. त्यामुळेच या वेळी तो आला असताना फसला आणि मारला गेला. रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं.  पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला. दहशवाद्यांना रियाझच्या खात्म्यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. बुऱ्हान वानी- दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय अशी ओळख असलेला बुऱ्हान वानी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. दिसायला देखणा असलेला बुऱ्हान हा युवकांमध्ये लोकप्रिय होता. त्याने अनेकांना दहशतवादाच्या मार्गात ओढलं होतं. दहशतवादाकडे वळलेला बुऱ्हान हा नादीष्ट होता. अनेक मुलींशी त्याची प्रेम प्रकरणं सुरू होती. अनेकिंना त्याने धोका दिला होता. त्यातल्याच एका मुलीने दिलेल्या माहितीवरून सुरक्षा दलाने त्याला 2016 मध्ये ठार केलं होतं. उमर माजिद – या दहशतवाद्याला 2018 मध्ये सुरक्षा दलाने ठार केलं होतं. त्याच्यावर 10 लाखांचं इनाम होतं. अशा प्रेकरणात आणि मुलींच्या नादात तो अडकला आणि सुरक्षा दलाच्या तावडीत सापडला. उमर खालिद – जैश ए मोहम्मदचा कमांडर असलेला उमेर 2017 मध्ये मारला गेला. त्याला अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. ज्या मुलींना त्याने धोका दिला त्यांनीच पोलिसांनी त्याची माहिती सांगितली होती. अबू दुजाना – 2017 मध्ये मारला गेलेला अबू हाही लष्कर ए तोयबाचा सदस्य होता. मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेला असतानाच तो सुरक्षा दलाच्या जाळ्यात सापडला. त्यानेच धोका दिलेल्या एका जुन्या मैत्रिणीने त्याची टिप दिली होती. जुनैद अहमद मट्टू – लष्कर ए तोयबाचा सदस्य असलेला जुनैदचे कुलगामच्या एका महिलेसोबत संबंध होते. त्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून त्याला 2017मध्ये ठार केलं. अब्दुल्लाह उनी – सुरक्षा दलाने 2012 मध्ये त्याचा खात्मा केला. त्याचीही अनेक अफेअर्स होती. तो मैत्रिणींना भेटायला अनेक ठिकाणी जात असे. सुरक्षा दलाने माहिती काढून एका चकमकीत त्याला ठार केलं. बशीर वानी – बशीर हाही आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी दुर्गम खेड्यात आला होता. तिला भेटून जात असतानात सुरक्षा दलाने त्याला घेरलं आणि त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या