पंकजा मुंडेंना धक्का.. भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात कारवाईचे आदेश

पंकजा मुंडेंना धक्का.. भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात कारवाईचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत विभागीय सहनिबंधकाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

बीड,21 डिसेंबर:भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात मोठ्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. बीड जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक (लातूर) यांचे दिले आहेत. तसेच जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी बी.एस.देशमुख यांना निलंबित करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

कर्ज माफीमधील प्रोत्साहनाची रक्कम बचत खात्यात जमा करण्याऐवजी कर्ज खात्यात जमा करून अफरातफर केल्याचा ठपका आदित्य सारडा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत विभागीय सहनिबंधकाने कारवाईचे आदेश दिले आहेत. बचत खात्याऐवजी कर्ज खात्यात रक्कम वर्ग करणे बँकेला महागात पडले आहे. या संदर्भात शेतकरी नेते कालिदास अपेट यांनी तक्रार केली होती. त्यानुसार सहकार कायदा 1960 यामधील कलम 79 व इतर पोट कलमान्वये दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याच्या भावना कालिदास अपेट यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले आदित्य सारडा?

डबघाईला आलेली बँक सुस्थितीत आणताना बँकेने हा निर्णय घेतला होता. या बाबतीत कुठल्याही खातेदाराची तक्रार नाही. कर्ज माफीमधील संपूर्ण रक्कम लाभार्थीना देण्यात आली. उलट प्रोत्साहनासाठी मिळाल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार कर्ज देऊ शकलो, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. तसेच या बाबतीत कायदेशीर पद्धतीने जाणार आहोत असे सांगितले.

बीडमधील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी बिल विरोधात शुक्रवारी (20 डिसेंबर) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बीड शहरात झालेली दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 307(attempt to munder)तसेच 135 आणि 353 कलमानुसार गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 31 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 103 जनांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बीडमध्ये बंद दरम्यान लागलं होतं गालबोट..

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बंद हिंसक वळण लागलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बीड शहरातील बशीर गंज, भाजीमंडई, राजुरी वेस, डीसीसी बँकेत परिसरातही दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या