इंदोरीकर महाराजांबद्दल पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले...

इंदोरीकर महाराजांबद्दल पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले...

'भाजपचे लोक जसे एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत,' असं रोहित पवार म्हणाले.

  • Share this:

उस्मानाबाद, 18 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी वादात सापलेल्या इंदोरीकर महाराज यांचे समर्थन केलं आहे. 'इंदोरीकर महाराज यांनी आज लेखी माफी मागितली आहे. त्यामुळे खोलात जाण्याची गरज नाही. भाजपचे लोक जसे एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत,' असं रोहित पवार म्हणाले.

एकीकडे रोहित पवार यांनी इंदोरीकर महाराज यांचं समर्थन केलं असलं तरीही त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी केली आहे. 'ते तसे बोलले आहेत का? त्यांचा हेतू काय होता हे तपासले पाहिजे. त्यांची कीर्तन करण्याची पद्धत सोपी असते. व्यसनमुक्ती सारखे काम ते करतात, याचाही विचार व्हावा,' असं रोहित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचा खरपूर समाचार

उस्मानाबाद इथं बोलताना रोहित पवार यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'ते कितीही मोठ्याने ओरडले तरी ते फक्त आणखी वर्षभर ओरडतील. वर्षानंतर त्यांचे कोणीच ऐकणार नाही. त्यांची ओरड फक्त आमदार आणि कार्यकर्ते फुटू नये यासाठी आहे,' असं म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाइमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,' असं इंदोरीकर म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 10:32 PM IST

ताज्या बातम्या