'त्या रात्री अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर...'

'त्या रात्री अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर...'

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेल्या अजमल कसाबसह हल्ल्याबाबत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात नवा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या राकेश मारिया त्यांच्या आगामी Let Me Say It Now या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत. 26/11 या दहशतवादी हल्ल्याबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. जर कसाब जिवंत पकडला गेला नसता तर मुंबईवरचा दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी हिंदू ठरवण्याचा पाकचा डाव यशस्वी ठरला असता असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमज कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं.

माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे की, पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना (ISI) 26/11 च्या हल्ल्यात हिंदू दहशतवाद्याचे रुप देऊ पाहत होती. या हल्ल्यातील 10 हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावटी ओळखपत्र पाठविण्यात आले होते. कसाबकडेही असंच एक ओळखपत्र सापडलं होतं. ज्यावर समीर चौधरी असं लिहिलं होतं.

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात खुलासा केला आहे की 26/11 च्या हल्ल्यात हिंदू दहशतवाद दाखविण्याचा प्लान होता. सर्व दहशतवाद्यांना बनावटी हिंदू नावं, ओळखपत्र व हाताता गंडाही घालण्यात आला होता.

कसाबचं हैद्राबादमधील अरुणोदय कॉलेजचं ओळखपत्र तयार करण्यात आलं होतं. मात्र कॉलेजकडे विचारणा केली असता हे ओळखपत्र बनावट असल्याचं समोर आलं.

केव्हा झाली होती कसाबला फाशी

26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवाद्यांनी तीन जागांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते. या 10 दहशतवाद्यांमध्ये एक अजमल कसाब जिंवत पकडण्यात आला होता. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

मारिया यांचा शीना बोरा प्रकरणातील खुलासा

आपल्या 'Let Me Say It Now' या पुस्तकात राकेश मारिया यांनी लिहिले आहे की, मुंबई पोलिसाती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शीना बोरा हत्या प्रकरणासंबंधित एका महत्त्वपूर्ण माहितीपासून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लांब ठेवले. या प्रकरणात मारिया यांनी त्यांच्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल केल्याचा आरोप फेटाळला आहे. या पुस्तकात मारिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलीस आयुक्तांचे उत्तराधिकारी जावेद अहमद यांचे आणि पीटर मुखर्जींसोबतचे संबंध माहिती होते.

वाचा : 'हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नव्हे, पोलिसांच्या पिस्तूलने झाली'

First published: February 18, 2020, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading